Teesta Setalvad यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

Supreme Court: तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Teesta Setalvad
Teesta SetalvadDainik Gomantak

Supreme Court: तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, 'याचिकाकर्ता एक महिला आहे, जी दोन महिन्यांपासून कोठडीत आहे. संबंधित बाब 2002-2010 मधील दस्तऐवजाची आहे. त्यांना सात दिवस कोठडीत ठेवून चौकशी करण्याची संधी तपास यंत्रणेला मिळाली असती. रेकॉर्डवरील परिस्थिती पाहता, प्रकरण प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने अंतरिम जामिनाचा विचार करायला हवा होता,' असे आमचे मत आहे.

दरम्यान, तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश यूयू लळित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू भट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. गुजरात सरकारच्या वतीने एसजी तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाने (High Court) एवढा वेळ का घेतला, असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) उपस्थित केला. मेहता पुढे म्हणाले की, 3 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात 168 खटले दाखल करण्यात आले होते.

Teesta Setalvad
Teesta Setalvad यांच्या अडचणीत वाढ, जामीन देण्यास न्यायालयाने दिला नकार

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता यांना पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता यांच्या उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेबाबत म्हटले आहे की, आमच्या निर्णयाचा किंवा टिप्पणीचा त्यावर परिणाम होऊ नये.

Teesta Setalvad
Teesta Setalwad यांच्या जामिनावर SC चं मोठं वक्तव्य, 'GJ सरकारने FIR चा आधार सांगावा'

सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, 'आम्ही अंतरिम जामीनाबाबत हा निर्णय दिला आहे. गुजरात उच्च न्यायालय या प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करु शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणांचा त्यांच्यावर प्रभाव पडू नये.' गुजरात (Gujarat) उच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी 19 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com