बिहारचा कौल भाजपकडून ‘हायजॅक’

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

पोस्टल मतात गैरव्यवहार झाला असून त्याची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. बिहारी जनतेने महाआघाडीला पसंती दिलेली असताना मुख्यमंत्री मात्र चोर दरवाजातून सत्तेवर बसत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

पाटणा : मुख्यमंत्रीपदावर कोणीही बसले असले तर महाआघाडीलाच बिहारच्या जनमताचा कौल मिळाला आहे. हा कौल भाजपने हायजॅक केला आहे. लोकांची फसवणूक करत एनडीएने निवडणूक जिंकली आहे. मात्र आपलीच आघाडी खरी विजेती आहे, असे महाआघाडी आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आज स्पष्ट केले. पोस्टल मतात गैरव्यवहार झाला असून त्याची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. बिहारी जनतेने महाआघाडीला पसंती दिलेली असताना मुख्यमंत्री मात्र चोर दरवाजातून सत्तेवर बसत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

राजदचे नेते तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या विधिमंडळ नेतेपदी आज एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार हे साम, दाम, कटकारस्थानाचा वापर करुनही या ३१ वर्षाच्या युवकाला रोखू शकले नाहीत. राजदला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर नितीशकुमार यांच्या चेहऱ्याची रौनक कोठे गेली, असा सवालही त्यांनी केला. ते तिसऱ्या स्थानावर गेले असून हा बदलाचा कौल आहे. नितीश मुख्यमंत्रीहोतील, परंतु जनतेच्या मनावर आमचे रा्य असेल.

संबंधित बातम्या