तेजस्वी फिरले अन्‌ युवकांच्या मनात भरले !

तेजस्वी फिरले अन्‌ युवकांच्या मनात भरले !
Tejaswi Yadav has influenced the youth voters by signifying the issues of employment

पाटणा :  बिहार निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा शनिवारी संपल्यावर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल समोर यायला सुरुवात झाली. संपूर्ण निवडणूक काळात ‘माहोल’ करणाऱ्या तेजस्वी यादव यांचा बोलबाला या आकडेवारीतही पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष निकाल काहीही लागला, तरी बिहारमधील नेतृत्व म्हणून तेजस्वी यांनी छाप उमटवली आहे, हे नितीशकुमार यांनाही मान्य करावे  लागेल. पायाला भिंगरी लावून बिहार पालथे घालताना बेरोजगारीच्या मुद्द्यावर तरुण आणि नवमतदारांच्या मनात तेजस्वी यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.

नितीशकुमार यांनी १५ वर्षांच्या सत्तेच्या कालखंडात बिहारमध्ये रस्ते, वीज, पाणी आणि पायाभूत सुविधांबाबत केलेले काम समाधानकारक आहे, असे बोलले जाते. मात्र याच काळात वाढत गेलेला बेरोजगारीचा आलेख तेजस्वी यांनी अचूकपणे हेरला. ‘आमचे सरकार आल्यावर लगेचच १० लाख सरकारी नोकऱ्या देऊ'', अशी घोषणा तेजस्वी यांनी केली. नोकऱ्या कशा देणार? असा उलट प्रश्न तेजस्वी यांना विचारणाऱ्या जेडीयू आणि भाजपने १९ लाख नोकऱ्यांची घोषणा केली.

तेजस्वी यांची मेहनत इतकी प्रचंड होती, की त्यांनी २१ दिवसांच्या प्रचार कालावधीत एकट्याने २५१ सभा घेतल्या. ही सरासरी १२ च्या आसपास आहे. तेजस्वी यांच्या मेहनतीपणाची जोरदार चर्चा झाली. भ्रष्ट्राचार प्रकरणात शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या चेहऱ्याचा वापर निवडणूक प्रचारात कुठेही करायचा नाही, असे नियोजन करताना केवळ तेजस्वी यांचाच चेहरा पुढे केला गेला. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com