बिहार विधानसभा निवडणूक: सुरूवातीच्या पिछाडीनंतर सत्ताधारी 'एनडीए'ची पुन्हा घोडदौड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नीतिशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार की तेजस्वी यांचे तेज झळकणार, हे आता काही तासांनी कळणार आहे.  विधानसभेच्या २४३ मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी झाली असून ३८ जिल्ह्यात ५५ ठिकाणी ही प्रक्रिया होत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तेजस्वी यादव आघाडीवर होते.

पाटणा- सबंध देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नीतिशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार की तेजस्वी यांचे तेज झळकणार, हे आता काही तासांनी कळणार आहे. विधानसभेच्या २४३ मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी झाली असून, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एनडीए आघाडीवर होते. ३८ जिल्ह्यात ५५ ठिकाणी ही प्रक्रिया होत आहे. याबाबत सोमवारी निवडणूक आयोगाने व्हिसीद्वारे सर्वकाही ठीक आहे की नाही, हे जाणून घेतले. 
  
राम मंदिराच्या मुद्यावर, पुलवामाच्या घटनेचा परत उद्घोष करत आणि कोरोना लशीच्या विनामुल्य वीतरणाचे आश्वासन देत केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील सरकारमधील भागीदार असलेल्या भाजपने मतदारांना आपल्याक़डे आकर्षि करण्याचा प्रयत्न केला आहे. एनडीए आणि महाआघाडी या दोघांनी सरकार स्थापनेचे दावे केले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी संजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गामुळे खबरदारीचे उपाय म्हणून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७३ हजार अधिक मतदान केंद्र स्थापन केले होते. त्यामुळे निकालाला विलंब लागू शकतो. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी होईल आणि त्यानंतर साडे आठ वाजता इव्हीएम मतांची मोजणी सुरु होईल. या प्रक्रियेनंतर निकालाचे कल हाती येण्यास ४५ मिनिटे लागू शकतात.

त्रिस्तरीय सुरक्षा तैना

राज्यातील सर्व मतदानमोजणी केंद्राच्या आसपास अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्राच्या मार्गावर बॅरिकेडस लावण्यात आले असून अर्धा किलोमीटर मतमोजणी केंद्रापासून अलीकडेच नागरिकांना रोखले जाणार आहे. पासधारकानाच मतदान केंद्राकडे सोडले जाणार आहे. केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि परिसरात बिहार पोलिस आणि राखीव दलाचे जवान तैनात केले जात आहेत. 
 

संबंधित बातम्या