Amarnath Cloudburst: तेलंगणाचे BJP आमदार थोडक्यात बचावले, सांगितली ढगफूटीची थरारक कहाणी

आमदार विशेष संरक्षणात असल्याने लष्कराने आमदाराच्या कुटुंबाला श्रीनगरला जाण्यास मदत केली.
Continuous debris clearing and search for missing continue near the cloudburst-affected areas.
Continuous debris clearing and search for missing continue near the cloudburst-affected areas.ANI

Amarnath Cloudburst: तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह कुटुंबासह अमरनाथ यात्रेला गेले होते. शुक्रवारी सायंकाळी अचानक झालेल्या ढगफुटीच्या घटनेत ते थोडक्यात बचावले. राजा सिंह आणि त्यांचे कुटुंबीय हेलिकॉप्टरने अमरनाथला पोहोचले होते. अमरनाथमध्ये ढगफुटीच्या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हून अधिक जखमी आहेत. याशिवाय 48 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. लष्कराचे पथक सतत बचाव कार्यात गुंतले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आमदार राजा सिंह यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'शुक्रवारी हवामान खराब होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबासह डोंगरावरून खाली उतरण्यासाठी पोनीजचा (ponies) वापर केला. आम्हाला वाटले की हवामान अचानक बदलले आणि खराब झाले. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर सेवाही रद्द होईल, म्हणून आम्ही पोनीज वापरून टेकड्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला.'

Continuous debris clearing and search for missing continue near the cloudburst-affected areas.
Amarnath Cloudburst: अमरनाथ ढगफूटी अपघातात 15 जणांचा मृत्यू, 60 बेपत्ता

खाली ढग फुटताना दिसले

ते म्हणाला- मी डोंगरांच्या खाली सुमारे एक किलोमीटर ढग फुटताना पाहिले. पुरात अनेक तंबू वाहून गेले. आमदार विशेष संरक्षणात असल्याने लष्कराने कुटुंबाला श्रीनगरला जाण्यास मदत केली. तेलंगणासह इतर राज्यातील लोक तेथे अडकले आहेत.

किमान 50 लोक वाहून गेले

आमदारांच्या म्हणण्यानुसार, काल अमरनाथ गुहेत हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. 'डोंगरातून पाणी वाहत होते आणि काही तंबू भरले होते.अमरनाथ गुहेत लष्कर मोठे काम करत होते. पण, अशा परिस्थितीत ते असहाय होते आणि अंधारही खूप दाट होता. पुरात किमान 50 लोक वाहून गेल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Continuous debris clearing and search for missing continue near the cloudburst-affected areas.
अमरनाथनंतर जम्मूच्या डोडा जिल्ह्यात ढगफूटी, अनेक घरे-वाहने ढिगाऱ्याखाली

सुमारे 40 लोक बेपत्ता आहेत तर पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू झाली आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर ती पुढे ढकलण्यात आली असून बचावकार्य संपल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com