एप्रिलमध्येच तापमानाने मोडला 122 वर्षांचा रेकॉर्ड, मेमध्येही चढणार पारा

भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील एप्रिल मधील तापमान 1900 नंतर सर्वाधिक होते
एप्रिलमध्येच तापमानाने मोडला 122 वर्षांचा रेकॉर्ड, मेमध्येही चढणार पारा
Weather UpdatesDainik Gomantak

भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) कायम आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील एप्रिल मधील तापमान 1900 नंतर सर्वाधिक होते आणि मे महिन्यातही उत्तर आणि पश्चिम भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, उर्वरित देशातील तापमान मार्च आणि एप्रिलच्या पातळीला स्पर्श करणार नाही तर त्यापुढेही जाण्याची शक्यता आहे. (Weather Updates Today)

हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मे महिन्यात उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये सामान्य किमान तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य तापमान राहण्याची दाट शक्यता आहे. आयएमडीचे डीजी मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, मे महिन्यात राजस्थान, गुजरात, दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये उष्ण वारे वाहत राहतील.

या वर्षीचा एप्रिल महिना 1901 नंतर भारतातील चौथा सर्वाधिक उष्ण महिना होता. तर भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल हा १२२ वर्षांतील सर्वात उष्ण राहिला आहे. एप्रिल 1 ते 28 पर्यंत, वायव्य भारतात सरासरी तापमान 35.9 °C होते तर मध्य भारतात 37.78 °C होते.

Weather Updates
हाय गर्मी...! गोव्यात पारा चढला, एप्रिलमध्ये 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

हवामानाच्या अंदाजानुसार, 1 ते 2 मे दरम्यान, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सांगितले की पश्चिम आणि उत्तर राजस्थान, विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाबचा काही भाग, हरियाणा, दिल्ली आणि तेलंगणा, झारखंड, बिहार, अंतर्गत ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे. काही भागांमध्ये परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे. मान्सूनपूर्व क्रियाकलाप सुरू झाल्यामुळे, 2 मे पासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या स्थितीत काही सुधारणा होऊ शकते.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता, देशातील बहुतांश भागात मे महिन्यात रात्रीच्या वेळीही उष्णता जाणवेल. ते म्हणाले की, यावर्षी मे महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात असेही म्हटले आहे की मे महिन्यात उत्तर-पश्चिम आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण-पूर्व द्वीपकल्पात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Updates
उष्णतेमुळे लोकांचे हाल! कडक उन्हात मुसळधार पावसाची शक्यता

राजस्थानमध्ये रात्रीही उष्णतेची लाट

आजकाल राजस्थान कडक उन्हाच्ये चटके सोसत आहे. तिथे रात्रीचे तापमानही 31.1 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान 46 अंशांच्या वर राहिले असून, त्यामुळे येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जयपूर येथील हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सध्याची उष्णतेची लाट पुढील तीन-चार दिवस कायम राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.