राजधानीला हुडहुडी भरली
Temperature lowered in the capital city

राजधानीला हुडहुडी भरली

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आता थंडीचा कडाका वाढू लागला असून यंदाचा ऑक्टोबर महिना मागील ५८ वर्षातील सर्वाधिक थंडीचा राहिला, असे हवामान खात्याने म्हटले आहे. 

दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यातील आतापर्यंतचे सरासरी तापमान १९.१ अंश सेल्सिअस राहिले आहे. याआधी १९६२ च्या ऑक्टोबर महिन्यात १६.९ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती.  त्यानंतर या ऑक्टोबरमधील तापमानाची सरासरी १७.२ अंश सेल्सिअस एवढी नीचांकी नोंदविण्यात आली.  गुरुवारी तर फक्त १२.५ अंश तापमान नोंदविले गेले होते. हे मागील २६ वर्षातील ऑक्टोबर महिन्यातले आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. याआधी १९९४ मध्ये ३१ ऑक्टोबरला १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com