भारताची संरक्षण क्षमता वाढणार; लवकरच होणार राफेलचे आगमन 

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 मार्च 2021

भारतीय वायू सेनेच्या क्षमतेत लवकरच मोठी वाढ होणार आहे. कारण नवीन दहा राफेल लढाऊ विमाने वायू सेनेत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय वायू सेनेच्या क्षमतेत लवकरच मोठी वाढ होणार आहे. कारण नवीन दहा राफेल लढाऊ विमाने वायू सेनेत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आणि या विमानांच्या आगमनामुळे भारतीय वायू सेनेत राफेल लढाऊ विमानांची नवी स्क्वाड्रन तयार होणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन दहा राफेल लढाऊ विमाने दाखल होणार असल्यामुळे भारतीय वायू सेनेतील राफेल विमानांची संख्या वाढून 21 होणार आहे. यापूर्वी भारतीय वायू सेनेत 11 राफेल विमाने दाखल झाली होती. ही विमाने भारतीय वायू सेनेच्या अंबाला स्थित हवाई अड्ड्यावर 17 स्क्वॉड्रॉनसह उड्डाण करत आहेत. (Ten new Rafale fighter jets will enter the Indian Air Force)  

पुढील दोन ते तीन दिवसांत फ्रान्सहून तीन राफेल विमाने भारतात दाखल होणार आहेत. ही विमाने भारतात थेट फ्रान्समधून येणार असून या विमानांचे रिफ्युलिंग मधे भारताच्या मित्र देशांच्या एअरफोर्सकडून करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ, पुढील महिन्याच्या उत्तरार्धात यापैकी 7 ते 8 राफेल विमाने आणि त्याच्या नंतर राफेलची प्रशिक्षक आवृत्ती विमान भारतात दाखल होणार असल्याचे समजते. त्यामुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेते मोठी वाढ होणार आहे.    

देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

यापूर्वी, गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्टच्या कालावधीत राफेल (Rafael) विमाने भारताच्या हवाई दलात सामील होण्यास सुरुवात झाली होती. व भारताने या विमानांना कार्यान्वित करत अगदी कमी काळात पोस्टिंग सुद्धा केले होते. भारताने मागील वर्षाच्या मे महिन्यात चीन सोबत झालेल्या संघर्षानंतर राफेल विमान पूर्व लडाख आणि इतर ठिकाणी गस्त घालण्यासाठी तैनात केले होते. तर फ्रान्सहून (France) देशात आल्यानंतर राफेल हे विमान अंबालामध्ये उतरवण्यात आले होते. आणि यातील काही विमानांना नंतर हशिमारा येथे हलवण्यात आले होते. याच ठिकाणी राफेल विमानांची दुसरी स्क्वाड्रन कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

दरम्यान, भारताने फ्रान्सकडून सप्टेंबर 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक विमाने भारतीय वायू सेनेत दाखल होणार आहेत. भारत आता स्वदेशी विकसित स्टील्थ फाइटर अ‍ॅडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसची 114 मल्टीरोल लढाऊ विमानांचे ऑर्डर देणार आहे. या विमानांची सात पथके येत्या 15 ते 20 वर्षांत हवाई दलात सामील होतील.  

संबंधित बातम्या