Tripura Impact: गोव्यातही मुस्लिम बांधवांच्या रॅलीवरून तणाव

रॅली काढण्यासाठी परवानगी न घेतल्याने रॅलीला मान्यता देण्यात आली नाही. दरम्यान, या पोलिस बंदोबस्तामुळे परिसरात शांतता पसरली होती.
Tripura Impact: गोव्यातही मुस्लिम बांधवांच्या रॅलीवरून तणाव
Tensions rise in Goa over Muslim ralliesDainik Gomantak

सासष्टी: त्रिपुरामध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काल रुमडामळ परिसरातील मुस्लिम बांधवांनी त्रिपुरामध्ये मुस्लिम बांधवांवर अन्याय झाल्याचा दावा करून दुकाने बंद ठेवून रॅली काढून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ही रॅली होणार असल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता, पण रॅली काढण्यासाठी परवानगी न घेतल्याने रॅलीला मान्यता देण्यात आली नाही. दरम्यान, या पोलिस बंदोबस्तामुळे परिसरात शांतता पसरली होती.

Tensions rise in Goa over Muslim rallies
गुजरात दंगलीत कारसेवकांच्या मृतदेहांची निदर्शने करत केली हिंसेची तयारी : जाफरी

काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूवरील हिंसाचारानंतर त्रिपुरामध्ये हिंदू, मुस्लिम वाद सुरू झाला. त्रिपुरामध्ये मुस्लिम बांधवांवर अन्याय होत असल्याचा दावा करीत रुमडामळ परिसरात मुस्लिम बांधवांची रॅली होणार असल्याचा संदेश समाज माध्यमांवर बराच व्हायरल होत होता. रुमडामळ परिसरात सकाळी काहींनी दुकाने बंद केली, पण पोलिस या ठिकाणी पोहचल्यावर सर्वांनी दुकाने खुली करण्यास सुरवात केली.

Tensions rise in Goa over Muslim rallies
Bitcoin Scam: मुख्यमंत्र्यांवर कारवाई का नाही? सिद्धरामय्या यांचा PM मोदींना सवाल

मान्यता नाकारली....

मुस्लिम बांधवांनी रॅली काढण्यात येणार असल्याचे संदेशात स्पष्ट केले होते, पण रॅली काढण्यासाठी परवानगी घेतली नव्हती.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या परिसरात शंभरावर पोलिसांना तैनात करण्यात आले होते. या परिसरात पोलिस बंदोबस्त असल्यामुळे हा परिसर शांततेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com