मध्य प्रदेशात भीषण अपघात; बस कालव्यात पडून 39 प्रवाशांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

मध्य प्रदेशच्या सिधी येथे आज मोठा अपघात झाला. 54 घेऊन निघालेली बस सिधी येथील रामपूर नाईकिन पोलिस स्टेशनलगत असलेल्या भागातील कालव्यात पडली.

सिधी :  मध्य प्रदेशच्या सिधी येथे आज मोठा अपघात झाला. 54 घेऊन निघालेली बस सिधी येथील रामपूर नाईकिन पोलिस स्टेशनलगत असलेल्या भागातील कालव्यात पडली. आतापर्यंत 39 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या भीषण अपघातानंतर सात जणांना वाचविण्यात आले. तर चालक कालव्यातून पोहून पळून गेला होता, मात्र त्याला ताब्यात घेण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बस अपघाताबाबत सिधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अमानुषपणाचा कळस! गर्भवती महिलेची काढली धिंडं; व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी बस सीधीहून सतनाकडे जात होती. ओव्हरटेक करताना ती थेट ओढ्यावरून कालव्यात पडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व आसपासच्या लोकांनी बसमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यास सुरवात केली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले. एसडीआरएफ आणि गोताखोरांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच बसमधील लोकांचे नातेवाईकही घटनास्थळी पोहचले आहेत, घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. कालव्याची खोली 20 ते 22 फूट असल्याची नोंद आहे. अपघातानंतर चार तासांनी सकाळी 11.45 ला क्रेनच्या मदतीने बसला बाहेर काढण्यात आले.

लाल किल्ला ते टूलकिट प्रकरणात काय काय घडलं? पोलिसांनी केला खुलासा 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बसची क्षमता 32 प्रवाशांची होती, परंतु बसमध्ये सुमारे 54 प्रवासी होते. बस थेट मार्गावरून चुहिया खोऱ्यामार्गे सतनाकडे जायची होती, परंतु ट्राफिक जाम झाल्यामुळे चालकाने मार्ग बदलला.तो कालव्याच्या काठावरुन बस घेऊन जात होता. रस्ता अगदी अरुंद होता आणि यावेळी चालकाचा तोल गेला. झाँसीहून रांचीकडे जाणारा महामार्ग सतना, रीवा, सिधी आणि सिंगरौली मार्गे जातो. येथील रस्ता खराब आणि अपूर्ण आहे.

गृहमंत्री शहा यांनी शिवराज सिंग चौहानांशी चर्चा केली

गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी ट्वीट केले की, “मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील बस अपघात खूप दुःखद आहे, मी मुख्यमंत्री शिवराज जी यांच्याशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन मदत व बचावासाठी सर्वतोपरी मदत करत आहे. मृतांच्या नातेवाईकांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरच बरे होण्याच्या शुभेच्छा देतो.

बसचे परमिट रद्द केले आहे

परिवहन मंत्री गोविंदसिंग राजपूत यांनी बसचे परमिट रद्द केले आहे. तसेच, परिवहन आयुक्तांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही बस जबलानाथ परिहार ट्रॅव्हल्सची होती. बसचे मालक कमलेश्वर सिंह आहेत. मंत्री गोविंदसिंग राजपूत म्हणाले की, तपासात जो दोषी आढळेल त्याला सोडले जाणार नाही.

संबंधित बातम्या