जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा पोलिसांवर हल्ला, एकजण ठार

जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा पोलिसांवर हल्ला, एकजण ठार
Terrorist attack on police Jammu Kashmir at SrinagarTwitter @ ANI

जम्मू काश्मीरमधील(Jammu Kashmir) आतंकी हल्ले काही केल्या थांबत नाहीत. जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील (Srinagar) नटीपोरा (Natipora) भागात काल पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला आहे. यानंतर, प्रत्युत्तरादाखल, पोलीस दलाने एका दहशतवाद्याला ठार केले आहे . मात्र, दुसरा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे . पोलिसांनी (Jammu Police) शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. जम्मू -काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Terrorist attack on police Jammu Kashmir at Srinagar)

एक दिवसापूर्वीच म्हणजे गुरुवारीच दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या सफकदल भागात रात्री 8:40 वाजता सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला होता . पण या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नव्हता . एवढेच नाही तर दहशतवाद्यांनी २ दिवसांपूर्वीच एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली होती , ज्यात एका महिलेचाही समावेश होता. यापूर्वी मंगळवारी देखील दहशतवाद्यांनी दीड तासात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची गोळ्या घालून हत्या केली होती .

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीरमधील नागरिकांची, विशेषत: अल्पसंख्यांकांची लक्ष्यित हत्या करण्याचा उद्देश म्हणजे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि जुन्या-जुन्या सांप्रदायिक सलोख्याला हानी पोहचवणे आहे. सिंह म्हणाले की जे मानवता, बंधुता आणि स्थानिक मूल्यांना लक्ष्य करत आहेत ते लवकरच सर्वांसमोर येईल

 Terrorist attack on police Jammu Kashmir at Srinagar
Lakhimpur Kheri: 'आम्ही तुमच्या तपासावर समाधानी नाही'

काश्मीरमध्ये पाच दिवसांत सात नागरिकांचा बळी गेला आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया पाहता गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक देखील घेतली होती . शहा यांनी जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना दिल्लीला बोलावले आहे.आणि आता पुढे काय करायचे जम्मू काश्मिरातली सतत होणार हे हल्ले कसे थांबवायचे हा प्रश्न भारत सरकार पुढे आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com