श्रीनगरमध्य़े दहशतवाद्यांनी दोन पोलिसांना गोळ्या घालून केले ठार... घटनेचा व्हिडिओ व्हायरल

श्रीनगरमध्य़े दहशतवाद्यांनी दोन पोलिसांना गोळ्या घालून केले ठार... घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Terrorist opens fire in Srinagar district in Kashmir today The video of the incident went viral

श्रीनगर: श्रीनगर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात फिरन (काश्मिरी लिबाज) मध्ये एके-47  घेऊन येणाऱ्या दहशतवाद्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर अंदाधुंद गोळीबार केला. शिपायावर केलेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेला. जखमी सैनिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. दहशतवाद्यांच्या शोधात सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घालून कारवाई सुरू केली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

श्रीनगरच्या बारजुल्ला भागात दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या दोन कर्मचाऱ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की या दहशतवादी हल्ल्यात कुपवाडा येथील मोहम्मद युसुफ आणि लोग्रीपोरा येथील सुहैल अहमद शहीद झाले आहेत. 

72 तासातच दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये आणखी एक भयानक कृत्य केले आहे. या पूर्वी जम्मू-काश्मीरच्या सोनवारमध्ये झालेल्या हल्ल्यात कृष्णा ढाब्यातील एक कर्मचारी जखमी झाला होता.

दरम्यान यापूर्वी बुधवारी शहरातील अतिदक्षतेच्या दुर्गनाग भागात दहशतवाद्यांनी रेस्टॉरंट मालकाच्या मुलाला गोळ्या घालून जखमी केले होते. युरोपियन युनियनसह विविध देशांतील 24-सदस्यांच्या शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरला भेट दिल्यानंतर काही तासांनी हा हल्ला झाला. हे शिष्टमंडळ घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर हॉटेलमध्ये थांबले होते. या हल्ल्याची जबाबदारी मुस्लिम जांबाज फोर्सने घेतली होती. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com