श्रीनगरच्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी केला गोळीबार, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
श्रीनगरच्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी केला गोळीबार, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Terrorists Attack srinagarANI

आज सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला आहे. श्रीनगरमधील अली जान रोडवर असलेल्या आयवा ब्रिजवर (Aiwa Bridge) दहशतवाद्यांनी एका पोलिसावर गोळीबार केला. या घटनेत पोलीस गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या ताज्या घटनेबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. (Terrorists Attack Srinagar)

याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेच्या मार्गाजवळ ही चकमक झाली. मोहम्मद अश्रफ खान उर्फ ​​अश्रफ मौलवी/मंसूर-उल-हक, मोहम्मद रफिक आणि रोशन जमीर तंत्र उर्फ ​​आकिब अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

Terrorists Attack srinagar
Jammu and Kashmir: विधानसभा जागांच्या फेरबदलाबाबत परिसीमन आयोगाचा अहवाल जाहीर

एका मोठ्या यशात, सुरक्षा दलांनी शुक्रवारी दक्षिण काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्वात जुन्या दहशतवाद्यांपैकी एक अशरफ मोलवी आणि इतर दोन अतिरेक्यांना ठार मारले. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बटकूट भागातील जंगलात मोलवी आणि इतर दोन दहशतवादी मारले गेले. या वृत्ताला दुजोरा देताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार म्हणाले की, पहलगाममध्ये अश्रफ मोलवीसह अन्य दोन दहशतवादी मारले गेले आहेत. दोन वर्षांपूर्वी 6 मे 2020 रोजी रियाझ नायकू मारला गेल्यानंतर अश्रफ मोलवीला काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीनचा ऑपरेशन कमांडर बनवण्यात आले होते.

Terrorists Attack srinagar
Jammu And Kashmir: अमरनाथ यात्रेच्या मार्गावर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील तेंगपावा कोकरनाग भागात राहणारा मोहम्मद अशरफ खान उर्फ ​​अशरफ मोलवी 2013 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता आणि लवकरच खोऱ्यातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बनला होता. आयजीपी कुमार म्हणाले की, स्थानिक लोकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यात त्यांचा मोठा हात होता.

पोलीस आणि लष्कराच्या 19RR च्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला आणि बटकूट जंगलात शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या संयुक्त पथकाने संशयित जागेकडे त्यांचा शोध अधिक तीव्र केल्याने, लपलेल्या दहशतवाद्यांनी शोध पक्षावर गोळीबार केला, त्यानंतर चकमक झाली ज्यामध्ये तीनही दहशतवादी ठार झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.