'जोपर्यंत एमएसपी वर कायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही'

याच पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी आज तीन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.
'जोपर्यंत एमएसपी वर कायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही'
Rakesh TikaitDainik Gomantak

मागील दीड वर्षापासून मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. याच पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज तीन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.

यातच आता राकेश टीकैत (Rakesh Tikait) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोदी सरकार जोपर्यंत एमएसपी वर कायदा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषीविषयक तीनही कायदे मागे (Three Farm Laws) घेण्याच्या निर्णयानंतर देशातील अन्नदात्यानी सत्याग्रह करून डोके टेकवले, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी सांगितले. काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधात काढलेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.

Rakesh Tikait
शेतकरी आंदोलनाचा राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

राहुल गांधींनी ट्विट करून लिहिले की, 'देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे डोके झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंद का किसान!.'' या कमेंटसह राहुल गांधींनी स्वतःचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते 'आमचे शेतकरी जे काही करत आहेत त्याचा मला अभिमान आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी माझ्या शेतकर्‍यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि नेहमीच करत राहीन. एक दिवस हा कायदा मागे घेण्यास केंद्र सरकारला नक्कीच भाग पडेल हे माझे शब्द चिन्हांकित करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com