मुलानेच येडियुरप्पांची केली दिशाभूल! लिंगायत समाजाच्या मठाधिपतींचा गौप्यस्फोट
B. S. YeddyurappaDainik Gomantak

मुलानेच येडियुरप्पांची केली दिशाभूल! लिंगायत समाजाच्या मठाधिपतींचा गौप्यस्फोट

मात्र आता येडीयुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांना घरातूनच राजकिय धक्का दिला असल्याच्या चर्चेने जोर दिला धरला आहे.

बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांनी कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भाजपमधील (BJP) कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याची कर्नाटकच्या राजकिय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच एक नाव पुढे आले ते बसवराज बोम्मई यांचं. आणि अखेर त्यांच्या गळ्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली. मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमधून मुक्त झाल्यानंतर येडीयुरप्पा यांना पक्षश्रेष्ठी कोणती नवी जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आता येडीयुरप्पा यांना घरातूनच राजकिय धक्का दिला असल्याच्या चर्चेने जोर दिला धरला आहे. खुद्द त्यांच्या मुलानेच त्यांची दिशाभूल केली असल्याचे समोर आले आहे. आणि विशेष म्हणजे हा असा गौप्यस्फोट लिंगायत समाजाच्या मठाधिपतींनी केला आहे.

B. S. Yeddyurappa
Karnataka: माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होणार

दरम्यान, कर्नाटकातील बहुसंख्यांक असलेल्या लिंगायत समाजाने मात्र मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांना येडीयुरप्पा यांच्याएवढी मान्यता दिली नाही. येडीयुरप्पा यांनी पद सोडताच या लिंगायत समाजाने बोम्मई सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली. यातच या समाजाने आरक्षण देण्याची मागणी लावून धरली. सहा महिन्यांपूर्वीच या समाजाला आरक्षण देण्यात आले होते. आता यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरु करण्यात येत आहे. राज्यामधील लिंगायत समाजामध्ये 70 टक्के पंचमशील आहेत. राज्य सरकारने 2 अ ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. यासाठी येत्या महिन्याभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील सरकारला दिला आहे.

B. S. Yeddyurappa
Karnataka: येडियुरप्पांनंतर कोण होणार मुख्यमंत्री?

शिवाय, लिंगायत समाजाचे मठाधिपती म्हणाले, बी. एस. येडीयुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही 500 किलोमीटरची पायी पदयात्रा काढली होती. मात्र काही लोकांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांची फसवणूक केली. यामध्ये त्यांच्या मुलाचाही समावेश होतो. आमचा लिंगायत समाज हा याआगोदर येडीयुरप्पा यांच्या पाठीशी होता. मात्र आता त्यांना आम्ही पाठिंबा देणे बंद केले आहे. आम्हाला येडीयुरप्पा सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी ते आश्वासन पाळले नाही. त्यावेळी येडीयुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र हे भाजपचे उपाध्यक्ष होते. मुख्यमंत्री पद सोडण्यामागे येडीयुरप्पा यांचे पुत्र कारणीभूत असल्याचे राजकिय वर्तुळामध्ये बोलले जात आहे. येडीयुरप्पा यांचे सगळे महत्त्वाचे निर्णय त्यांचे पुत्र विजयेंद्र घेत होते, असा आरोप अनेक मंत्र्यांकडून करण्यात आला होते. त्याचबरोबर विजयेंद्र ही त्यावेळी सुपरसीएम बनले होते अशी टिकाही भाजपमधील काही मंत्र्यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com