सोशल मीडियाच्या वापरासाठी वयोमर्यादा ठरवा, मोदी सरकारला हायकोर्टाचा सल्ला

मोदी सरकारने काही ट्विट्स आणि ट्विटर अकाउंट्सना ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. त्याला Twitter कंपनीने आव्हान दिल्याने हे प्रकरण सुरू झाले होते.
The Central government should consider imposing an age limit on the use of social media says Karnataka High Court.
The Central government should consider imposing an age limit on the use of social media says Karnataka High Court.Dainik Gomantak

The Central government should consider imposing an age limit on the use of social media says Karnataka High Court:

केंद्र सरकारने देशात सोशल मीडियाच्या वापरावर वयोमर्यादा लागू करण्याचा विचार करावा, जेणेकरून मुलांना ते वापरण्यापासून रोखता येईल असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले.

न्यायमूर्ती जी नरेंद्र आणि न्यायमूर्ती विजयकुमार ए पाटील यांच्या खंडपीठाने मुलांच्या लहाण वयातील सोशल मीडियाच्या वापराबाबतच्या धोक्यांवर विचार करताना हा सल्ला दिला.

"सोशल मीडियावर बंदी घालणे सर्वात चांगले होईल. आज शाळेत जाणारी मुले व्यसनाधीन आहेत. किमान, तुम्ही वापरकर्त्याची वयोमर्यादा आणली पाहिजे. 17-18 वर्षांच्या मुलांकडे देशाच्या हिताचे काय आणि हिताचे काय नाही हे ठरवण्याची परिपक्वता आहे का? वापरकर्त्याचे वय किमान २१ वर्षे असावे, कारण याच वयात त्याला मतदानाचा अधिकार मिळतो," न्यायालयाने तोंडी निरीक्षण केले.

2021 आणि 2022 मध्ये काही ट्विट आणि खाती ब्लॉक करण्याची मोदी सरकारने मागणी केली होती. या आदेशांसंबंधीच्या प्रकरणात ट्विटर कॉर्पच्या अपीलातील सुनावनीच्या शेवटी न्यायालयाने ही टिप्पणी केली.

The Central government should consider imposing an age limit on the use of social media says Karnataka High Court.
"घरातील सर्व कामं करणं फक्त पत्नीचीच जबाबदारी नाही", हायकोर्टाने पतीला फटकारले

सुनावनीवेळी केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, कायद्यानुसार यूजर्सना आता काही ऑनलाइन गेम अॅक्सेस करण्यासाठी आधार आणि इतर कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली आहेत.

यावर न्यायालय म्हणाले, "सोशल मीडियासाठीही अशा उपाययोजना का वाढवल्या जात नाहीत."

The Central government should consider imposing an age limit on the use of social media says Karnataka High Court.
स्मशानभूमीची जागा पुन्हा बांके बिहारी मंदिराच्या नावावर करा, हायकोर्टाचे आदेश

मोदी सरकारच्या काही ट्विट्स आणि ट्विटर अकाउंट्सना ब्लॉक करण्याच्या आदेशांना Twitter कंपनीने आव्हान दिल्याने हे प्रकरण सुरू झाले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल-न्यायाधीशांनी आव्हान फेटाळले आणि सरकारच्या आदेशांचे पालन न केल्याबद्दल 50 लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिले होते.

ट्विटर कॉर्पोरेशनने एकल न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान दिले. 10 ऑगस्ट रोजी, ट्विटर कॉर्पोरेशनने 25 लाख रुपये जमा केल्याने उच्च न्यायालयाने एकल-न्यायाधीशांच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com