Economic Survey 2023: जीडीपी वाढ केवळ 6.5 टक्के राहण्याचा आर्थिक सर्व्हेक्षणात अंदाज

निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केले आर्थिक सर्व्हेक्षण
Union Finance Minister Nirmala Sitharaman
Union Finance Minister Nirmala SitharamanDainik Gomantak

Economic Survey 2023: केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी आर्थिक सर्व्हेक्षण संसदेत सादर केले. यात 2023-24 साठी GDP दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी आहे. दरम्यना, नॉमिनल GDP 11 टक्के राहिल, असा अंदाज आहे. तर 2023 च्या आर्थिक वर्षासाठी रियल GDP अंदाज 7 टक्के इतका व्यक्त करण्यात आला आहे.

Union Finance Minister Nirmala Sitharaman
Economic Survey 2023: आर्थिक सर्वेक्षणाबद्दल जाणून घ्या सर्व काही... आज होणार संसदेत सादर

चालू आर्थिक वर्षात 7 % आणि 2021-22 मध्ये 8.7 % च्या तुलनेत 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.5 % वाढेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, असे अर्थसंकल्पपूर्व आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. जागतिक वस्तूंच्या किमती वाढत राहिल्याने चालू खात्यातील तूट वाढू शकते आणि रुपया दबावाखाली येऊ शकतो, असेही यात म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षातील 6.8 टक्के महागाई खाजगी उपभोग रोखण्यासाठी पुरेशी नाही किंवा गुंतवणूक कमकुवत करण्याइतकी कमी नाही. कर्ज घेण्याची किंमत दीर्घ कालावधीसाठी 'उच्च' राहू शकते आणि अडकलेली चलनवाढ घट्ट होण्याचे चक्र लांबवू शकते. कोविड साथीच्या आजारातून भारताची रिकव्हरी तुलनेने जलद होती.

Union Finance Minister Nirmala Sitharaman
Murtaza Abbasi: IIT बॉम्बेमधून इंजिनिअरिंग, ISIS शी संबंध; गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्यातील...!

सर्व्हेमध्ये म्हटले आहे की, जगात भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनत आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी (PPP) मध्ये भारत जगात तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे तर एक्सचेंज रेटमध्ये पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे.

संसदेत सर्व्हे सादर झाल्यानंतर चीफ इकनॉमिक अॅडवायझर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रेस कॉन्सफरन्स झाली. आर्थिक सर्वेक्षण 2022-23 बाबत ते प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वर म्हणाले की, अर्थव्यवस्थेची रिकव्हरी पूर्ण झाली आहे.

नॉन-बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रांमधील ताळेबंद आता निरोगी आहे. त्यामुळे, आम्हाला कोरोना महामारीतून रिकव्हरीबाबत अधिक बोलण्याची गरज नाही. आम्हाला पुढील टप्प्याकडे पहावे लागेल.

IMF ने त्यांच्या जागतिक आर्थिक अंदाजात चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP अंदाज 6.8 टक्के, आणि पुढील म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठई 6.1 टक्के 2024-25 साठी 6.8 टक्के वर्तवला आहे. भारताची अर्थव्यवस्था या दशकाच्या उर्वरित काळात अधिक चांगली कामगिरी करेल, असेही आयएमएफने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com