बंगालच्या रेल्वे स्थानकावर 'इंग्लिश चायवाली'!

नोकरी न मिळाल्याने एमए पास असलेल्या तुकतुकीने (Tuktuki Das) चहाचा धंदा करण्याचे ठरवले.
बंगालच्या रेल्वे स्थानकावर 'इंग्लिश चायवाली'!
Tuktuki DasDainik Gomantak

पश्चिम बंगालच्या (West Bengal) उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हबरा रेल्वे स्थानकाच्या (Habra Railway Station) बाहेर असलेले 'एमए इंग्लिश चायवाली' (MA English Chaiwali) हे दुकान आकर्षणाचे केंद्र बनले आहे. जे एक मुलगी चालवते. तुकतुकी दास (Tuktuki Das) असे या मुलीचे नाव आहे. नोकरी न मिळाल्याने एमए पास असलेल्या तुकतुकीने चहाचा धंदा करण्याचे ठरवले. तिचे वडील व्हॅन ड्रायव्हर आहेत तर आई लहान किराणा दुकान चालवते. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तुकतुकीचे दुकान पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत. तुकतुकीच्या दुकानाचे 'एमए इंग्लिश चायवाली' लोकांना चांगलेच पसंतीला पडले आहे.

खरे तर तुकतुकीने इंग्रजीत एमए केले आहे, परंतु खूप प्रयत्न करुनही नोकरी न मिळाल्याने तिने हाबरा रेल्वे स्थानकाबाहेर 'एमए इंग्लिश चायवाली' नावाने चहाचे दुकान उघडले. तिच्या दुकानाच्या आकर्षक नावामुळे ती खूप लोकप्रिय झाली. तुकतुकी ही अतिशय साध्या कुटुंबातून आलेली आहे. तिचे वडील व्हॅन ड्रायव्हर असून तिची आई लहान किराणा दुकान चालवते. सुरुवातीला पालकांनी तुकतुकीच्या चहाचे दुकान उघडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. यातून आपल्याला काहीही फायदा होणार नाही आणि लोक आपली चेष्टा करतील, असे ते म्हणाले. तुकतुकीला 'एमबीए चायवाला' दुकान उघडण्याची कल्पना सुचली. तिने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली, आणि 1 नोव्हेंबर 2021 रोजी 'एमए इंग्लिश चायवाली' नावाने दुकान उघडले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तुकतुकीचे दुकान पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत.

Tuktuki Das
भारतातील 'ही' नदी वाहते प्रवाहाच्या उलट्या दिशेने, पाहा याची रंजक कहाणी

दरम्यान तुकतुकी म्हणाली, “मला वाटते की, कोणतेही काम लहान नसते आणि म्हणून मी माझ्या चहाच्या स्टॉलवर 'एमबीए चायवाला' सारखे काम करु लागले. सुरवातीला जागा शोधणे अवघड होते, परंतु मी ते शोधण्यात यशस्वी झाले. आता मी चहा आणि नाश्ता विकते. माझ्याकडे एमएची पदवी असल्याने मी दुकानाला असे नाव दिले." तुकतुकीने पुन्हा एकदा म्हटले की, कोणतीही नोकरी "छोटी" नसते आणि मला माझ्या व्यवसायास मोठे करायचे आहे. दरम्यान वडील प्रशांत दास म्हणाले, “सुरुवातीला मी तिच्या निर्णयावर खूश नव्हतो, कारण ती शिक्षिका होईल या आशेने आम्ही तिला शिक्षण दिले होते. परंतु तिला चहा विकायचा होता. मी पुनर्विचार केला, जर स्वावलंबी होण्याचा तिचा हाच निर्णय असेल तर तो चांगला आहे. ”

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com