देशाच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

जी. किशन रेड्डी यांनी सांगितल्या सरकारी योजना
Tourism Industry in India
Tourism Industry in IndiaDainik Gomantak

Tourism: कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात संपूर्ण जग थांबले होते. साथीच्या एकूण तीन लाटांमुळे देशाच्या पर्यटन उद्योगाशी संबंधित सुमारे 2 कोटी 15 लाख लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या असल्याची माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी सोमवारी दिली.

Tourism Industry in India
गोव्याच्या मुख्यमंत्री पदावरून संभ्रम कायम, भाजप नेत्यांची आज दिल्लीत विशेष बैठक

2020 सालच्या सुरुवातीला पहिल्यांदा आलेल्या कोरोना संक्रमणाच्या (Corona Infection) पहिल्या लाटेदरम्यान देशात पर्यटक येण्याचे प्रमाण 93 टक्क्यांनी, दुसऱ्या लाटेत 79 टक्क्यांनी, तर तिसऱ्या लाटेदरम्यान 64 टक्क्यांनी कमी झाले आहे. महासाथीच्या पर्यटनावर झालेल्या परिणामाबाबत आम्ही अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, करोनाच्या पहिल्या लाटेत 1 कोटी 45 लाख, दुसऱ्या लाटेत 52 लाख, तर तिसऱ्या लाटेत 18८ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या, असे रेड्डी यांनी सांगितले.

देशात पर्यटनक्षेत्राला (Tourism) आलेली मरगळ दूर करण्यासाठी आता प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. या क्षेत्राला मदत करण्यासाठी प्रवास व पर्यटनाशी (Travel and tourism) संबंधितांना 10 लाख रुपयांचे आणि प्रवासाची माहिती देणाऱ्या गाईडना 1 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. शक्य असेल त्या सर्व मार्गानी पर्यटन क्षेत्राला मदत करण्याचे आवाहन मी सर्व राज्य सरकारांना करतो, असे यावेळी किशन रेड्डी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com