'द काश्मीर फाइल्स' वरून गुलाम नबी आझाद यांची पाकिस्तानवर टीका

'द काश्मीर फाइल्स'वरून गुलाम नबी आझाद यांनी पाकिस्तानवर टीका करत म्हणाले की, दहशतवादाने खोऱ्यात मृत्यू आणि विनाश आणला आहे.
Ghulam Nabi Azad News
Ghulam Nabi Azad NewsDainik Gomantak

बॉलिवूड चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सध्या देशात खूपच चर्चेत आला आहे आणि चर्चेचा विषय झाला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. 90 च्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंड्यांची हत्या आणि त्यांच्यावरती झालेला गुन्हा या चित्रपटात दाखवण्यात आला. या चित्रपटाचा संदर्भ देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी माध्यमांना सांगितले की, तीन दशकांहून अधिक काळ पाकिस्तान (Pakistan) पुरस्कृत दहशतवादाने जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला प्रभावित केले. पुढे ते म्हणाले की, दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. (The Kashmir Files Ghulam Nabi Azad has criticized Pakistan from this film)

Ghulam Nabi Azad News
बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने 25 जणांचा मृत्यू

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, सिनेमागृहांमध्ये जातीयवादी घोषणाबाजीच्या घटना घडल्या आहेत आणि त्याबद्दल लोकांच्या मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे दिसून येते आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जम्मू सिव्हिल सोसायटीने आझाद यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करत असताना काँग्रेस नेते म्हणाले की, "पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने मृत्यू आणि विनाश आणले आणि तेच सर्व वाईट गोष्टींसाठी पुर्णपणे जबाबदार आहे."(Ghulam Nabi Azad News)

समाजातील 90 टक्के वाईट गोष्टींना राजकारणी जबाबदार आहेत: गुलाम नबी आझाद

ते म्हणाले की, 'अनेक लोकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले, हजारो महिला विधवा झाल्या आणि लाखो मुले अनाथ झाली आहेत. त्यांनी मुस्लिम, हिंदू किंवा पंडित सर्वांना लक्ष्य केले आणि धार्मिक स्थळेही सोडली नाहीत. समाजातील 90 टक्के वाईट गोष्टींना राजकारणी जबाबदार आहेत, जे आपल्या व्होट बँकेसाठी जनतेत फूट पाडत असतात, असा आरोपही आझाद यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी शंका व्यक्त केली की, यात कोणते राजकारण बदल घडवून आणू शकते की नाही?

Ghulam Nabi Azad News
J&K बँकेशी संबंधित 20 लोकांविरुद्ध CBI ने केला गुन्हा दाखल

'महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू तसेच धर्मनिरपेक्षतेचे सर्वात मोठे अनुयायी आहेत'

काँग्रेस नेते म्हणाले की, 'जम्मू हे एकमेव ठिकाण आहे जिथे जम्मू-काश्मीरमधील सर्व 22 जिल्ह्यांतील आणि लडाखमधील लोक वास्तव्यास आहेत.' महात्मा गांधींचे स्मरण करून आझाद म्हणाले की, 'मला वाटते महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू तसेच धर्मनिरपेक्षतेचे सर्वात मोठे अनुयायी होते. जो खऱ्या अर्थाने धर्म पाळतो तो खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असतो असं ही ते यावेळी म्हणाले. धर्माचा खरा अनुयायी हा गांधींसारखा सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष असतो, आणि खोटा अनुयायी अत्यंत धोकादायक असतो.'

पुढे ते म्हणाले की, 'भारतातील राजकारण इतके कुरूप झाले आहे की, कधी कधी आपण माणूस आहोत की काय अशी शंका यायला लागते. आणि आपल्याला समाजात बदल घडवून आणायचा आहे. कधी कधी मला वाटतं की मी निवृत्त होऊन समाजसेवा करू लागलोय हे अचानक तुम्हाला कळलं ही काही मोठी गोष्ट नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com