मुलीच्या संगोपनासाठी आई 30 वर्षे पुरूष म्हणून वावरली

पुरुषप्रधान समाजाच्या छळाला कंटाळून घेतला निर्णय
S Petchiammal
S Petchiammal Dainik Gomantak

तामिळनाडूतील तूतुकुडी जिल्ह्यातील 57 वर्षीय महिलेने आपल्या मुलीचे संगोपन करण्यासाठी 30 वर्षे पुरुषाचा वेश धारण केल्याची बाब समोर आली आहे. तिची ही अविश्वसनीय कथा सर्वत्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.एस. पेचियाम्मल 20 वर्षांची होती. तेंव्हा तीने पतीला गमावले. पतीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्या पालनपोषणासाठी तिला काम करावे लागले. ( The mother worked as a man for 30 years to take care of her daughter )

S Petchiammal
कोचीन शिपयार्डमध्ये डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची संधी

तीची समस्या तिला सतावत होती. पण, गावात काम करणे पेचियाम्मल यांच्यासाठी निश्चितच सोपी गोष्ट नव्हती. लोक त्यांचा छळ करत होते. त्रास देत होते. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी त्यांनी कंस्ट्रक्शन साइट्स, हॉटेल व चहाच्या दुकानांसह अनेक ठिकाणी काम करुन पाहिले. पण, सर्वच ठिकाणी टोमणे व त्रास झाला. येथूनच पेचियाम्मल यांनी एक धाडसी निर्णय घेतला.

S Petchiammal
भारताने गव्हाच्या निर्यातीवर म्हणून घातली बंदी

त्यांनी पुरूष प्रधान समाजात पुरूष म्हणूनच वावरण्याचा निश्चय केला. त्यांनी तिरुचेंदुर मुरुगन मंदिरात जावून आपले केस दान केले. साडीच्या जागी शर्ट व लुंगी घालणे सुरू केले. एवढेच नाही तर त्यांनी आपले नाव बदलून मुथु असे केले.

S Petchiammal
भारताने गव्हाच्या निर्यातीवर म्हणून घातली बंदी

मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, स्वतःचे नाव बदलल्यानंतर जवळपास 20 वर्षांनी त्या कट्टुनायक्कनपट्टी गावात स्थायिक झाल्या. त्यांच्या केवळ नातेवाईक व मुलीलाच त्या पुरूष नव्हे तर स्त्री असल्याचे माहित होते. त्यांनी तब्बल 30 वर्ष पुरूषपण जगले. त्यानंतर त्यांना कामाच्या ठिकाणी अन्नाची म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अशी ही थक्क करणारी संघर्ष गाथा तिने केवळ आपल्या पोटच्या गोळ्याला जगवण्यासाठी करावा लागल्याचे सांगितले.

मुथु म्हणूनच घ्यावयाचा आहे अखेरचा श्वास

त्यांनी सांगितले की, मी पेंटिंग, चहा व पराठे करण्यापासून 100 दिवस मजुरी करण्यासारखी विविध प्रकारची कामे केली. यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी स्वतःचे व स्वतःच्या मुलीचे पालन पोषण केले. कालांतराने मुथु हीच माझी ओळख बनली. माझा आधार क्रमांक, मतदान ओळखपत्र व बँक खात्यासह सर्वच सरकारी दस्तावेजांवरही तेच नाव जोडले गेले.पेचियाम्मलच्या मुलगी शणमुगासुंदरीचे आता लग्न झाले आहे. पण, पेचियाम्मल आताही पुरूष म्हणूनच जगत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना आपले हे रूप कायम ठेवायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com