'द न्यूयॉर्क टाइम्स'कडून मोठा खुलासा, नरेंद्र मोदींचा फोटो असलेली बातमी बनावट

‘Last, Best Hope of The Earth’ अर्थात 'पृर्थ्वी तलावरील सर्वात शेवटची आणि सर्वोत्तम आशादायी व्यक्ती' अशा आशयाच्या माथळ्यासह पहिल्या पानावर नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह वृत्त छापल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले.
'द न्यूयॉर्क टाइम्स'कडून मोठा खुलासा, नरेंद्र मोदींचा फोटो असलेली बातमी बनावट
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अमेरिका दौरा केल्यानंतर द न्यूयॉर्क टाईम्स (The New York Times) या अंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्राने त्यांची स्तुती केली होती. ‘Last, Best Hope of The Earth’ अर्थात 'पृर्थ्वी तलावरील सर्वात शेवटची आणि सर्वोत्तम आशादायी व्यक्ती' अशा आशयाच्या माथळ्यासह पहिल्या पानावर नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह वृत्त छापल्याचे फोटो सोशल मिडियावर (Social media) व्हायरल झाले. या बातमीमुळे अनेकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. तर अनेकांनी याच्या जास्तच खोलामध्ये जात हे वृत्त फेक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. आता टाईम्सनेही याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाची बैठक, या विषयांवर झाली चर्चा

दरम्यान, न्यूयॉर्क कम्युनिकेशनने याबाबत सोशल मिडियावरली ट्वीटरवरुन खुलासा केला आहे. त्यानुसार हा फोटो पूर्णतहा बनावट असल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदीसंदर्भात प्रचलित असलेल्या अनेकांपैकी ही एक आहे. नरेंद्र मोदीच्या संदर्भातील आमच्या सत्य आणि तथ्य वृत्त येथे पाहायला मिळतील, असेही म्हणत टाईम्स कम्युनिकेशनने एक लिंकही शेअर केली आहे. मोदींच्या फोटोसह द न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावरील हा मथळा सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी ट्विटरवरही आपली मते व्यक्त केली आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सऍपवरही हाच फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. मात्र या फोटोमधील तारखेचा घोळ सगळ्यांनाच बुचकाळ्यात पाडणारा असल्याचे दिसून आले आहे.

शिवाय, द न्यूयॉर्क टाईम्स आणि त्याखाली तारीख काहीशी पुसट असल्याचे दिसत आहे. तसेच ही जागा एडिटेड असल्याचेही वाटत आहे. तर सप्टेंबर महिन्याचे स्पेलिंगही चुकीचे लिहण्यात आले असल्याचे समोर आले आहे. September ऐवजी Setpember असे स्पेलिंग दिसत आहे. त्यामुळे, ही बातमी खोटी असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले आहे. त्यानंतर स्वत: द न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतची माहिती ट्विटरद्वारे देत यासंबंधीचा खुलासा केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com