Monsoon Update: मान्सूनचा बदलला मूड, कुठे हलक्या सरी तर कुठे कडक ऊन

उत्तर भारतातील जनतेला लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
Monsoon Update: मान्सूनचा बदलला मूड, कुठे हलक्या सरी तर कुठे कडक ऊन
Monsoon UpdatesDainik Gomantak

उत्तर भारतातील जनतेला लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. राजधानी दिल्लीतही कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या हालचाली लक्षात घेऊन येत्या सहा दिवसांमध्ये पावसाच्या शक्यतेसह यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जोरदार वारे आणि पाऊस आठवडाभर राहू शकतो असे ही सांगण्यात आले आहे. (The people of North India will soon be relieved from the heat)

 Monsoon Updates
कुलगाममधील बँक मॅनेजरच्या हत्येमध्ये सहभागी असलेला दहशतवादी शोपियान चकमकीत ठार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सफदरजंग वेधशाळेत कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर सोमवारी कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. राष्ट्रीय राजधानीत किमान तापमान 31.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व हवामान केंद्रांवर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस आणि 42 अंश सेल्सिअसच्या श्रेणीत नोंदवले गेले आहे. येत्या काही दिवसांत सतत पश्चिमी विक्षोभ आणि कमी पातळीचे पूर्वेकडील वारे वाहण्याची शक्यता असून त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.

IMD ने पुढील सहा दिवसांमध्ये गडगडाट किंवा हलक्या पावसाचा यलो अलर्ट इशारा दिला आहे, रविवारपर्यंत तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 जूनपासून पावसाळा सुरू झाल्याने या वेळी राजधानीत पावसाची नोंद झालेली नाहीये. स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, मान्सून 27 जून किंवा त्याच्या एक-दोन दिवस आधी दिल्लीत पोहोचेल.

इतर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांत, पश्चिम भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आहे तर पूर्व भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडला आहे. बिकानेर जिल्ह्यात गारपीट आणि पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी दिवस आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहिले आहे. पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पुढील तीन-चार दिवस सुरू राहील असे सांगण्यात आले आहे. आसाममधील गुवाहाटी येथे मुसळधार पावसात झालेल्या भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.

 Monsoon Updates
National Herald Case: सलग तिसऱ्या दिवशी होणार राहुल गांधींची ईडी चौकशी

सध्या हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट कायमच आहे. 15-16 जून रोजी कडक सूर्यप्रकाशापासून दिलासा मिळू शकतो, असे IMD सांगतो. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 13-15 जूनपर्यंत पश्चिम हिमालय प्रदेश आणि त्याच्या लगतच्या भागात पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान मध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हिमालयीन भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज IMDने वर्तवला आहे, तर 16 आणि 17 जून रोजी पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याचवेळी ईशान्य आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आणखी पाच दिवस जोरदार पाऊस पडू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com