विमानाच्या कॉकपिटमध्ये गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या एअरइंडियाचा 'तो' पायलट अखेर निलंबित

DGCA ने केली कारवाई; विमान कंपनीला 30 लाख रुपयांचा दंड
Air India
Air India Dainik Gomantak

DGCA Action Against Air India Pilot: एअर इंडियाच्या फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये महिला मैत्रिणीला बसवल्याप्रकरणी पायलटवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे.

यासोबतच DGCA ने एअर इंडियाच्या निष्काळजीपणाबद्दल विमान कंपन्यांना 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 27 फेब्रुवारीला दुबईहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये पायलटने आपल्या गर्लफ्रेंडला फ्लाईटच्या कॉकपिटमध्ये बसवले होते.

Air India
Karnataka Election: 'सरकार बनवणे हे आमचे ध्येय, कसे ते विचारु नका...', निकालापूर्वी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य!

सीईओंना कारणे दाखवा नोटीस

यापूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाच्या सीईओला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर डीजीसीएने आरोपी पायलटविरुद्ध तपास सुरू केला. पायलटने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे डीजीसीएने म्हटले होते.

या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल आणि कोणतीही तक्रार न नोंदवल्याबद्दल एव्हिएशन सिक्युरिटी हेड हेन्री डोनोहो यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

उड्डाणावेळी कमांडिंग पायलटने प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला DGCA नियमांचे उल्लंघन करून कॉकपिटमध्ये प्रवेश दिला, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले.

Air India
Karnataka Election: भाजप-काँग्रेसची वाढली धाकधूक, निकालापूर्वी 'किंगमेकर' कुमारस्वामी सिंगापूरला रवाना!

डीजीसीएने म्हटले आहे की हा प्रकार सुरक्षिततेचे संवेदनशील उल्लंघन असूनही एअर इंडियाने त्वरित सुधारात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

विमान नियम 1937 अंतर्गत निहित अधिकाराचा गैरवापर आणि उल्लंघन करण्यास परवानगी दिल्याबद्दल पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे." यासोबतच डीजीसीएने को-पायलटला देखील इशारा दिला आहे, कारण त्याने पार्टनरच्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये येण्यापासून रोखले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com