'पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला' : स्मृती इराणी

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. यात पंजाब राज्याचाही समावेश आहे.
Smriti Irani

Smriti Irani


Dainik Gomantak 

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. यात पंजाब राज्याचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. दरम्यान पंतप्रधान मोदी यांचा 15 ते 20 मिनिटं थांबविण्यात आला. त्यामुळे पंतप्रधानांना काही वेळ उड्डाणपूलावरच थांबण्याची वेळ आली. दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावरुन माध्यमाशी बोलताना पंजाबमधील कॉंग्रेस सरकारवर निशाणा साधला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, पंतप्रधान मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांचा ताफा हायवेवर काही वेळ थांबविण्यात आला. अशा प्रकारे पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधी पूर्वकल्पना का देण्यात आली नाही. देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची घटना कधीच घडली नाही.

'पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांचा ताफा रस्तेमार्गाने जाण्यासाठी कशी काय परवानगी दिली आली. पंजाब सरकारने पंतप्रधानांची सुरक्षा धोक्यात टाकली असल्याचे देखील यावेळी इराणी यांनी म्हटले. पंजाबच्या पवित्र भूमीवर पंजाब सरकारचा खुनशीपणा उघड झाला आहे. पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षेत ज्याप्रकारच्या त्रुटी दिसून आल्या त्यासंबंधी पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने उत्तर द्यावे,' अशी मागणी देखील इराणी यांनी माध्यमाशी बोलताना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com