
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी आई हीराबेन मोदी यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गुजरातला भेट देणार आहेत. दुसरीकडे, हिराबेन मोदी यांचा वाढदिवस खास बनवून गांधीनगरमधील रायसन पेट्रोल पंप ते पूज्य हिरा मार्ग या 80 मीटर रस्त्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (The road in Gandhinagar will be named after Prime Minister Narendra Modi's mother)
दरम्याान, 17 आणि 18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दोन दिवसीय गुजरात (Gujarat) दौऱ्यावर येणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदी आईची भेट घेतल्यानंतर पावागडमधील माँ कालीचे दर्शन घेतील. त्यानंतर ते वडोदरामधील एका जाहीर सभेलाही संबोधित करतील. गांधीनगरचे (Gandhinagar) महापौर हितेश मकवाना माध्यमाशी बोलताना सांगितले की, “हिराबा जेव्हा 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत, तेव्हा आम्ही रायसन परिसरातील 80 मीटर रस्त्याला 'पूज्य हिरा मार्ग' असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन येणाऱ्या पिढ्यांनी त्यांच्या अमूल्य जीवनापासून प्रेरणा घ्यावी.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा गांधीनगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या रायसन गावात धाकट्या मुलासोबत राहत आहेत. हिराबाच्या मुलांनी वडनगरमध्येही मोठा उत्सव आयोजित केला आहे. हिराबांचे पुत्र प्रल्हाद मोदी यांच्या म्हणण्यानुसार, "हिराबा जन्मशताब्दी जवळ येत असताना, आम्ही वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात नवचंडी यज्ञ आणि सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने मंदिरात संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे.''
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अन्य नामवंत कलाकारही कार्यक्रमात परफॉर्म करण्याची शक्यता आहे. गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी बुधवारी अधिकृत निवेदन जारी केले, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी 100 वर्षांचे होत असून राज्याच्या राजधानीतील जनतेची मागणी आणि भावना लक्षात घेता 80 मीटर रस्ता बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यास हिराबेन मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.