Supreme Court: ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून मागवले उत्तर

राजनाथ सिंह यांनी यापुर्वी जातिनिहाय जनगणना होणार असल्याचा याचिकेत दावा
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak

Supreme Court : आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) जातनिहाय जनगणनेचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि इतरांचे उत्तर मागवले आहे. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर या मुद्द्यावर सुनावणी झाली.

Supreme Court
Kanpur Money Heist: मनी हाईस्टप्रमाणे बोगदा खोदून SBI मधून 2 किलो सोन्याची चोरी

दरम्यान, ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीबाबत खंडपीठाने केंद्र सरकार, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि इतरांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या मुद्दय़ावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणासह अन्य समान प्रकरणाची यादी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिवक्ता कृष्णा कन्हैया पाल यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जात-आधारित सर्वेक्षण आणि जात-आधारित जनगणनेच्या अभावामुळे, सरकार मागासवर्गीयांच्या सर्व घटकांना कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यास असमर्थ आहे. या वर्गांमध्ये ओबीसींना महत्त्व आहे.

Supreme Court
Adhaar-Pan Link: 'या' तारखेपर्यंत आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड होईल निष्क्रीय, तुम्ही केले का?

यासोबतच, त्यांनी याचिकेत असा युक्तिवाद केला की, ठोस आकडेवारी नसताना ठोस धोरणे तयार करता येत नाहीत. कृष्णा कन्हैया पाल यांनी याचिकेत म्हटले आहे की, 2018 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी OBC लोकसंख्येची जनगणना जाहीर केली होती. ते म्हणाले होते की 2021 च्या जनगणनेदरम्यान, ओबीसी लोकसंख्येचा डेटा स्वतंत्रपणे गोळा केला जाईल. असे असतानाही केंद्र सरकारने 2017 मध्ये केलेल्या रोहिणी आयोगाचा अहवाल सादर केला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com