Ganga River Cruise: वाराणसीमध्ये गंगा नदीत जगातील सर्वाधिक लांबीच्या रिव्हर क्रूझचा 'या' दिवशी होणार प्रारंभ

3,200 किलोमीटरहून अधिक प्रवास, 50 पर्यटन स्थळांचा समावेश
MV Ganga Vilas River Cruise
MV Ganga Vilas River CruiseDainik Gomantak

MV Ganga Vilas River Cruise: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (13 जानेवारी) त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जगातील सर्वाधिक लांबीच्या नदी क्रूझला हिरवा झेंडा दाखवतील. 'एमव्ही गंगा विलास' असे या क्रूझचे नाव असून हे क्रूझ जहाज 3,200 किलोमीटरहून अधिक प्रवास करेल. सुमारे 50 पर्यटन स्थळांवर ते प्रवास करणार आहे. (World’s Longest River Cruise)

MV Ganga Vilas River Cruise
India Vs China: ड्रॅगनचे मनसुबे उधळून लावण्याची तयारी, पाकसाठीही धोक्याची घंटा; आता ड्रोन...

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, एमव्ही गंगा विलास नदीवरील क्रूझ जहाज शुक्रवारी वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला निघेल. या क्रूझमुळे देशातील नदी पर्यटनाच्या क्षेत्रातील विविध शक्यतांची दारे खुली होतील. ही क्रूझ भारत आणि बांगलादेशमधून जाणाऱ्या 27 नदी प्रणालींमधून आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचेल. या लांबच्या प्रवासात एमव्ही गंगा विलास क्रूझ पाटणा, साहिबगंज, कोलकाता, ढाका आणि गुवाहाटी सारख्या 50 पर्यटन स्थळांमधून जाणार आहे.

या क्रूझचा प्रवास 13 जानेवारीला वाराणसीपासून सुरू होईल आणि 1 मार्च ही क्रूझ दिब्रुगडला पोहोचण्याची शक्यता आहे. वाराणसीतील गंगा नदीघाटावर गंगा आरती करून ही क्रूझ आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. या प्रवासात क्रूझ प्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र सारनाथ, तंत्र क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध मायोंग आणि नदीत बांधलेल्या माजुली या बेटालाही भेट देईल.

MV Ganga Vilas River Cruise
Gautam Adani: 'मला इतकं प्रसिद्ध केलं की...', राहुल गांधींच्या आरोपांवर गौतम अदानी म्हणाले

पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडचे 32 पर्यटक

क्रूझच्या या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, एमव्ही गंगा विलास क्रूझच्या उद्घाटनामुळे भारत देखील रिव्हर क्रूझ क्षेत्रात जागतिक पातळीवर स्थान मिळवेल. सध्या देशात वाराणसी आणि कोलकाता दरम्यान आठ रिव्हर क्रूझ कार्यरत आहेत. याशिवाय दुसऱ्या राष्ट्रीय जलमार्गावर म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीतही क्रूझ वाहतूक सुरू असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com