वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी; जुनं वाहन वापरल्यास भरावा लागणार टॅक्स

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 मार्च 2021

सध्याच्या घडीला देशातील रस्त्यावर 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची 4 कोटी वाहने धावत आहेत.

सध्याच्या घडीला देशातील रस्त्यावर 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची 4 कोटी वाहने धावत आहेत. आणि याबाबतीत कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कर्नाटकच्या रस्त्यावर 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची 70 लाख वाहने धावत आहेत. ही वाहने ग्रीन टॅक्स अंतर्गत येतात. या वाहनांवर आता ग्रीन टॅक्स लागू करण्याची योजना सरकारने आखली आहे. केंद्र सरकारने 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्यांना पाठविला आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वाहनांच्या आकडेवारीचे डिजिटायझेशन केले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेले हे डिजिटल रेकॉर्ड केंद्रीय वाहन डेटाबेसवर आधारित आहे. मात्र यात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीप येथील वाहनांच्या आकडेवारीची संख्या यामध्ये नाही. तसेच देशातील रस्त्यांवर 15 वर्षांहून अधिक जुनी जी चार कोटी वाहने आहेत त्यातील दोन कोटी वाहने 20 वर्षाहून जुनी असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. 

गोव्याची समान नागरी संहिता आदर्शवत - सरन्यायाधीश शरद बोबडे 

यानंतर, जुनी वाहने चालविण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे. केंद्रीय वाहन डेटाबेसनुसार उत्तर प्रदेशमध्ये अशा वाहनांची संख्या 56.54 लाख आहे. व यातील 24.55 लाख वाहने ही 20 वर्षापूर्वीची आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 49.93 लाख जुनी वाहने धावत आहेत. आणि त्यामुळे दिल्ली याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त दिल्लीत 35.11 लाख वाहने जी 20 वर्षाहून जुनी आहेत. 

दरम्यान, जुन्या वाहनांवर लवकरच ग्रीन टॅक्स लावण्याची तयारी सरकारने केली आहे. पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव दिला होता.यावर्षी जानेवारीत आणलेला प्रस्ताव विचारासाठी राज्यांना पाठविण्यात आला आहे. तथापि काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश वेगवेगळ्या दरावर ग्रीन टॅक्स आकारत आहेत.

संबंधित बातम्या