''नव्या संसदेसाठी, पुतळ्यांसाठी पैसे आहेत मग लसीकरणासाठी नाहीत का?''

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरील माझ्या पत्राला उत्तर दिलेलं नाही.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) कोरोना लसीकरणच्या धोरणावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अद्याप कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरील माझ्या पत्राला उत्तर दिलेलं नाही, असं ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितलं. (There is money for a new parliament for statues isnt there for vaccinations)

‘’मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही. मोदी सरकारकडे नवी संसद आणि पुतळे बांधण्यासाठी 20,000 कोटी रुपये आहेत मग कोरोना लसीकरणासाठी 30,000 कोटी रुपये का दिले जात नाहीत?’’ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

केरळमध्ये 8 मे ते 16 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर

‘’पीएम केअर फंड (PM Cares Fund) कोठे आहे? मोदी देशातील तरुणांचा जीव धोक्यात का घालत आहेत? त्यांच्या नेत्यांनी कोवीड हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे तर ते इथं येत आहेत. ते इथे येऊन कोरोनाचा प्रसार करत आहेत,’’ अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

बुधवारी ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना  शुभेच्छ दिल्या आणि संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देत. ‘’धन्यवाद मोदीजी पश्चिम बंगालचे हीत लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सतत पाठिंब्याची मी अपेक्षा करते. मी माझ्या पूर्ण समर्थनासह आशा व्यक्त करते की, एकत्रितपणे आपण कोरोना महामारीच्या आणि इतर आव्हानांशी लढा देऊ आणि केंद्र-राज्यांच्या संबंधात नवीन आदर्श घालून देऊ,’’

 

संबंधित बातम्या