भारतीय हवाई दलाच्या संरक्षण सिद्धतेत होणार मोठी वाढ 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

भारताच्या संरक्षण सिद्धतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळाच्या समितीने आज 83 तेजस विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण सिद्धतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळाच्या समितीने आज 83 तेजस विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. आणि त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी म्हणून देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सुरक्षा मंत्रिमंडळाच्या समितीने भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमान तेजसच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे 83 तेजसच्या मार्क 1 ए प्रकारातील विमाने भारतीय हवाई दलात दाखल होणार आहेत. यासाठी भारत सरकारने 48000 कोटी रुपयांच्या खरेदी कराराला मंजुरी दिली असून, तेजस विमानाच्या खरेदी संदर्भात झालेला हा करार सर्वात मोठा देशी संरक्षण खरेदी करार असणार आहे. या करारामुळे भारतीय हवाईदल अधिक बळकट होईल. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीने केलेली आहे.    

लोहरीच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी जाळल्या कृषी कायद्याच्या प्रती 

तेजसच्या खरेदीमुळे भारतीय हवाई दलाला मोठी चालना मिळणार असून, हवाई दलातील लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्समध्ये होणारी घट थांबविण्यास मदत होणार आहे. तेजस (लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) हे हलके लढाऊ विमान आहे. शिवाय तेजसचे एमके -1 ए व्हेरियंट हे स्वदेशी डिझाइन केलेले, विकसित व निर्मित अत्याधुनिक आधुनिक चौथ्या आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही क्रिटिकल परिस्थितीत झेप घेण्याची क्षमता यामध्ये असून, बियॉंड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर (ईडब्ल्यू) सिस्टिम आणि एअर टू एअर रीफ्यूअलिंग (एएआर) ने हे लढाऊ विमान सुसज्ज आहे.  

दरम्यान, तेजस विमानाच्या या करारानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून बोलताना, हा करार भारतीय संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेसाठी मोठा गेमचेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे. तर तेजस विमानाच्या यापूर्वीची आवृत्ती 27 मे रोजीच भारतीय हवाई दलात सामील करण्यात आली आहे.      

संबंधित बातम्या