केरळ सरकारचा मोठा निर्णय, या 9 जातींना मिळाला OBC चा दर्जा

केरळ सरकारने राज्याच्या मागासवर्गीय (OBC) यादीत आणखी नऊ जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
केरळ सरकारचा मोठा निर्णय, या 9 जातींना मिळाला OBC चा दर्जा
pinarayi vijayanDainik Gomantak

तिरुवनंतपुरम : 9 castes will be included in list of OBC: केरळ सरकारने राज्याच्या मागासवर्गीय (OBC) यादीत आणखी नऊ जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एका अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

ओबीसींच्या यादीत खालील 9 जातींचा समावेश केला जाईल

कुरुक्कल/गुरुकल, चेट्टियार, हिंदू चेट्टी, पापडा चेट्टी, कुमारा क्षत्रिय, पुलुवा गौंडर, वेट्टुवा गौंडर, पदायची गौंडर आणि कविलिया या जातींचा यादीत समावेश केला जाईल. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, राज्याच्या ओबीसी यादीत गौंडरचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, केरळ सरकारने साउथ इंडियन युनायटेड चर्च (SIUC) मधील समुदाय वगळता ख्रिश्चन नाडर समुदायाचा राज्याच्या OBC यादीत समावेश केला होता.

pinarayi vijayan
लसीकरण प्रमाणपत्रावरुन मोदींचा फोटो हटवा, केरळ उच्च न्यायालयाने ठोठावला दंड

दरम्यान, संसदेकडून (Parliament) 127 वी घटनादुरुस्ती संमत केल्यानंतर या जातींचा ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचा अधिकार राज्यांना मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसिद्धीनुसार, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्लम, त्रिशूर आणि कन्नूरमध्ये राज्य विशेष शाखा युनिट्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षकांची तीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. याशिवाय मलबार कॅन्सर सेंटरचे नाव पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी सायन्सेस अँड रिसर्च करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com