Republic Day 2023: यंदाचा प्रजासत्ताक दिन असणार अनोखा; नारी शक्तीचे होणार दर्शन

अनेक गोष्टी दिसणार पहिल्यांदाच; भारतीय लष्कर दाखवणार 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्रांची ताकद
Republic Day Parade file photo
Republic Day Parade file photoDainik Gomantak

Republic Day 2023: राजधानी दिल्लीत होणारा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दरवर्षीच नयनरम्य होत असतो. तथापि, यंदाचा सोहळा जरा खास असणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात काही गोष्टी कर्तव्य पथावर प्रथमच होताना दिसणार आहेत. पैकी तीन गोष्टी यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहेत.

Republic Day Parade file photo
Republic Day: प्रजासत्ताकदिनाला मोदी सरकारकडून 'या' देशाला खास आमंत्रण,आहे ऐतिहासिक संबंध

या सोहळ्यात कर्तव्य पथावर प्रथमच भारतीय लष्कर केवळ 'मेड इन इंडिया' शस्त्रे आणि उपकरणे प्रदर्शित करताना दिसेल. परेडमधील इतर वैशिष्ट्ये म्हणजे इजिप्तमधील लष्करी तुकडी देखील अनौपचारिक संचलन करताना दिसणार आहे. याशिवाय भारतीय लष्करामध्ये भरतीसाठी अग्निवीर योजना केंद्र सरकारने सुरू केली होती. ते अग्निवीरदेखील प्रथमच या पथसंचलनात दिसणार आहेत.

याशिवाय नारी शक्तीचे वेगळे दर्शन यावेळी घडणार आहे. बीएसएफच्या उंट तुकडीचा भाग म्हणून महिला सैनिक आणि 144 नाविकांच्या नौदल दलाच्या नेत्या म्हणून एक महिला अधिकारी या पथसंचलनात दिसतील. दरम्यान, नौदलाचे IL-38 विमान नौदलातून निवृत्त होणार आहे. या विमानाने जवळपास चार दशकांहून अधिक काळ भारतीय नौदलात सेवा दिली आहे. हे विमान अखेरचा टेकऑफ या पथसंचलनात घेणार आहे.

Republic Day Parade file photo
Ramcharitmanas Row: रामचरितमानसच नाही तर स्वामी प्रसाद मौर्यांनी 'या' मुद्यावरही तोडले अकलेचे तारे

सकाळी 10.30 वाजता विजय चौकातून परेड सुरू होईल आणि तुकड्या लाल किल्ल्यापर्यंत कूच करतील. सशस्त्र दलांच्या आठ मार्चिंग तुकड्या असतील. त्यापैकी सहा तुकड्या लष्कराच्या असतील आणि प्रत्येकी एक तुकडी आयएएफ आणि नौदलाची असेल. पोलिस आणि निमलष्करी दलांसह एकूण 16 तुकड्या आहेत.

स्वदेशी 105 मिमी इंडियन फील्ड गन ब्रिटीशकालीन 25-पाउंडर गनची जागा घेतील, ज्या दुसऱ्या महायुद्धात 21 तोफांच्या सलामीसाठी वापरल्या गेल्या होत्या. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी या देशी तोफा वापरल्या गेल्या असल्या तरी प्रजासत्ताक दिनी त्यांचा वापर पहिल्यांदाच होणार आहे.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. 17 राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सहा विविध मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ या संचलनात सहभागी असणार आहेत. त्यातून भारताचा सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक-सामाजिक प्रगतीचे चित्रण होईल. दरम्यान, 29 जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट समारंभात, 3,500 स्वदेशी ड्रोनचा समावेश असलेला 'भारतातील सर्वात मोठा ड्रोन शो' होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com