iPhone In India: 'ही' भारतीय कंपनी देशातच बनवणार आयफोन; उत्पादनात चीनला टाकणार मागे

2027 पर्यंत प्रत्येक दुसरा आयफोन भारतात बनणार
Apple iPhone in India
Apple iPhone in IndiaDainik Gomantak

Apple iPhone In India: जगात अॅपल कंपनीच्या आयफोनचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होत असते. तथापि, आता आयफोनच्या निर्मितीमध्ये भारत चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी करत आहे. 2027 पर्यंत, जगात तयार होणाऱ्या प्रत्येक दोन आयफोनपैकी एक आयफोन भारतात तयार केला जाईल.

लवकरच टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवताना दिसणार आहे. आयफोनची निर्मिती करणारी टाटा समूह ही पहिली भारतीय कंपनी असेल.

Apple iPhone in India
Indian Railways: रेल्वेने करोडो प्रवाशांना दिला मोठा झटका, ट्रेनमधून काढले जनरल डबे!

टाटा समूह दक्षिण भारतात असलेला तैवानचा विस्ट्रॉन ग्रुप प्लान्ट खरेदी करणार आहे. हा करार लवकरच पूर्ण होईल, असे मानले जात आहे. त्यानंतर टाटा समूह विस्ट्रॉनच्या सहकार्याने भारतात आयफोन बनवणार आहे.

या संयुक्त उपक्रमात टाटा समूहाचा सर्वात मोठा हिस्सा असेल. आयफोनच्या निर्मितीमध्ये सध्या चीनचा मोठा दबदबा आहे. एकूण सध्या आयफोनपैकी 85 टक्के आयफोन चीनमध्ये तयार होतात.

आयफोन मेकर कंपनी अॅपलनेही भारतात आपल्या लेटेस्ट आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे. एका अंदाजानुसार, 2023 मध्ये फॉक्सकॉनद्वारे निर्मित आयफोनमध्ये 150 टक्के वाढ होऊ शकते. आणि 40 ते 45 टक्के आयफोन भारतातून निर्यात केले जातील. सध्या, Apple भारतात iPhone 12, iPhone 13, iPhone 14 बनवते.

Apple iPhone in India
Old Pension वर मोठी अपडेट, RBI ने जारी केली अधिसूचना; जाणून घ्या कधीपासून लागू होणार OPS?

सध्या आयफोन निर्मितीमध्ये भारताचा वाटा पाच टक्क्यांहून कमी आहे. पण 2027 पर्यंत प्रत्येक दोनपैकी एक आयफोन भारतात बनवला जाईल.

विशेष म्हणजे, साउथ चायना मॉर्निंग पोस्टनेच याबाबतचा अहवाल दिला आहे. तथापि, यापूर्वी, जेपी मॉर्गन या संस्थेनेदेखील 2025 पर्यंत भारतात 25 टक्के आयफोन उत्पादन होईल, असे म्हटले होते.

आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान भारतातून 2.5 अब्ज डॉलर किमतीचे iPhones निर्यात झाले आहेत, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com