Punjab Assembly Election Result 2022 : दिल्लीनंतर आता पंजाब, संपूर्ण देशात इन्कलाब होणार

आधी दिल्ली, आता पंजाब, संपूर्ण देशात इन्कलाब होणार : केजरीवालांचा एल्गार
Arvind Kejriwal
Arvind Kejriwaldainik gomantak

Punjab Assembly Election Result 2022 : देशातील पाच निवडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर आपचे राजकीय भविष्य चमकत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली नंतर गोव्याच्या राजकारणात पाऊल ठेवत आपले दोन उमेदवार निवडूण आणले आहेत. तर पंजाबवर एक हाती सत्ता काबीज करण्याकडे वाटचाल सुरू आहे. येथील विधानसभेच्या 117 जागा असून आप ने तब्बल 89 जागांवर आघाडी घेतली आहे. या विजयावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी 'आधी दिल्ली, आता पंजाब मग संपूर्ण देशात इन्कलाब होणार' असं म्हटलं आहे. तर भविष्यात देशाच्या राजकारणात आपण उतरू असा एल्गारच त्यांनी केला आहे. (This victory will revolutionize the whole country says Kejriwal)

यावेळी पंजाबच्या जनतेने सिद्धू, मुख्यमंत्री चन्नी, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह अशा मोठ्या दिग्गजांना नाकारल्याचे केजरीवाल म्हणाले. आपच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले. कुणीही येऊ द्या पण आप येऊ नये यासाठी षडयंत्र केलं गेलं. आपल्याला दहशतवादी (Terrorist) म्हणण्यात आले. पण जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याचा टोला केजरीवालांनी विरोधकांना लगावला.

यावेळी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना एका मोबाइल (Terrorist) रिपेअर करणाऱ्या कर्मचाऱ्याने हरवलं. ही आम आदमी पक्षाची खूप मोठी ताकद आहे, मी भगवंत मानचं अभिनंदन करतो. ते आता मुख्यमंत्री होतील. आपल्याला कोणाला शिव्या द्यायच्या नाहीत, आपल्याला सेवेची राजनीती करायची आहे, असं केजरीवाल म्हणाले.

तसेच केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, या सत्तांतरासाठी पंजाबच्या (Panjab) नागरिकांचं खूप खूप आभार मानतो. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे (CM) उमेदवार भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com