Vaccination: परदेशात जाणाऱ्यांना 28 दिवसांनंतर दुसरा डोस

vaccination
vaccination

रांची: शिक्षणासाठी(Education) किंवा नोकरीसाठी(Job) बाहेर देशात जाणाऱ्या प्रवाशांना यापुढे कोरोना लसीच्या(vaccine) दुसऱ्या डोससाठी 84 दिवस वाट बघावी लागणार नाही. पहिल्या डोसच्या 28 दिवसानंतरच बाहेर देशात जाणाऱ्या या लोकांना दुसरा डोस मिळू शकतो. कोरोना संसर्गाच्या(Covid-19) वाढत्या प्रभावामुळे लॉकडाउन(Lockdown) लागू झाल्यानंतर, जे लोक इतर राज्यांतून आणि परदेशात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गेले होते ते घरी परत आले. आता कोरोना संसर्गाची प्रसार मंदावला आहे. अनलॉक केल्यानंतर, लोकांची गर्दी देखील रस्त्यावर दिसायला लागली आहे. कोरोना लसीच्या पहिल्या डोसनंतर, दुसर्‍या डोससाठी 84 दिवसांची गॅप ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाहेर देशात जाणाऱ्या नागरीकांना थांबावे लागले.(Those going abroad will get a second dose of the vaccine after 28 days)

कागदपत्र दाखवावे लागतील
आपण केंद्रावर जाऊन सांगितले की मला परदेशात जायचे मला लस द्या, अस होणार नाही. त्याआधी आपल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाईल. जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जात असाल तर तुम्हाला तीथे प्रवेशाशी संबंधित सर्व कागदपत्रे दाखवावी लागतील. जर आपण नोकरीसाठी जात असाल तर तुम्हाला अपॉईंटमेंट लेटर किंवा ऑफर लेटर या सबंधीत कागदपत्रे दाखवावी लागतील. परदेशात शिक्षणासाठी नोकरी किंवा खेळांसाठी जाणाऱ्या लोकांसाठीच ही सोय करण्यात आली आहे. मार्गदर्शक सूचनाानुसार कोविडशील्ड लस घेणाऱ्या आणि बाहेर देशात जाणाऱ्या लोकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. यावर पासपोर्ट क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक असणार आहे. ही सुविधा 31 ऑगस्टपूर्वी परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी असेल.

फायदा मिळू शकेल
आवश्यक कारणास्तव परदेशात जाणाऱ्या लोकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. शशी भूषण खलखो यांनी दिली. 31 ऑगस्टपूर्वी परदेशात जाणारे लोक, ज्यांनी कोविडशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण केले आहेत आणि दुसरा डोस मिळण्यासाठी 84 दिवसाचा कालावधीत शिल्लक आहे, त्यांना दुसरा डोस मिळू शकेल. दुसर्‍या डोससाठी त्यांना 84 दिवस पूर्ण होण्याचीवाट बघावी लागणार नाही. यासाठी भारत सरकारने दिलेली मार्गदर्शक सूचना, संचालनालयाला प्राप्त झाल्या आहेत.

"कोरोनामुळे जे लोक देशात परतले होते त्यांना आता परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जायचे आहे. अशा परिस्थितीत त्यांना त्यांचे पासपोर्ट आणि कागदपत्रे घेऊन लसीकरण केंद्रात जावे लागेल. तेव्हाच त्यांना कोविशिल्टचा दुसरा डोस त्वरित 28 दिवसांनी दिला जाईल," अशी माहिती शशी भूषण खलखो यांनी माध्यमांना दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com