सत्ता मिळूनही नितीश नाराज ?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता एक दिवस उलटला तरी राज्याचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या या मौनाची येथील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता एक दिवस उलटला तरी राज्याचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या या मौनाची येथील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 

आपल्या पक्षाला कमी जागा मिळण्यास ते लोक जनशक्ती पक्ष (लोजप) जबाबदार असल्याचे मानत आहेत. याचा वचपा काढण्यासाठी लोजपला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा त्यांचा विचार आहे. अर्थात, नितीशकुमार हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) मुख्यमंत्री असतील, असे भाजपने वारंवार स्पष्ट केले आहे.  लोजपने ही निवडणूक केवळ नितीशकुमार यांच्याविरोधातच लढल्याने जेडीयूच्या २७ जागा घटल्या. जेडीयूचे उमेदवार पडण्यामागे लोजपच कारणीभूत ठरली. 

"जनता सर्वक्षेष्ठ आहे. त्यांनी एनडीएला बहुमत दिले आहे. त्यासाठी मी जनतेचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दलही मी धन्यवाद देतो."
- नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री

संबंधित बातम्या