जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी हल्ला; चार जवान जखमी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत.

कुलगाम :  जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत. कुलगाम जिल्ह्यातील शमसीपोरा गावानजीक महामार्गावर सॅनिटायझेशन ड्रिल दरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या रोड ओपनिंग कार्यक्रमावर सकाळी दहाच्या सुमारास ग्रेनेड हल्ला केला. श्रीनगर येथील संरक्षण जनसंपर्क आधिकाऱ्याने सांगितले की, “चार सैनिक जखमी झाले असून त्यांना बेस हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे."

पाकिस्तानातून तब्बल 18 वर्षानंतर भारतीय महिलेची सुटका

3 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्सने एकाला लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना आश्रय, रसद आणि इतर मदत पुरवण्यात गुंतल्याबद्दल अटक केली होती, ज्यात शस्त्रे आणि स्फोटक सामग्रीची वाहतूक याचा समावेश होता.

भारतीय अर्थव्यवस्था दोन आकडी विकासदर गाठणार आयएमएफने वर्तवला अंदाज 

सविस्तर माहिती येत आहे.. 

संबंधित बातम्या