तमिळनाडूला धडकून ‘निवार’ निवळले ; तीन नागरिक मृत्युमुखी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्री अडीचनंतर तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील किनारपट्टीवर धडकले. १३० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि धुवाधार पावसाने दोन्ही राज्यातील अनेक भागांना बुधवारी झोडपून काढले.

चेन्नई : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्री अडीचनंतर तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील किनारपट्टीवर धडकले. १३० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि धुवाधार पावसाने दोन्ही राज्यातील अनेक भागांना बुधवारी झोडपून काढले. तमिळनाडूत पावसाने तीन नागरिक मृत्युमुखी पडले तर तीन जण जखमी झाला. शेकडो झोपड्यांचे नुकसान झाली. वाऱ्यामुळे पडलेली ३८० पेक्षा जास्त झाडे हलविण्यात आली आहेत. अत्यावश्‍यक सेवा सुरळीत झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव अतुल्य मिश्रा यांनी आज दिली. 

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने किनारपट्टीवरील सुमारे दोन लाखाहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविले होते. पुदुच्चेरीच्या उत्तरेकडील ३० किलोमीटर अंतरावरील मरक्कनम या समुद्र किनाऱ्यावरील शहराला ‘निवार’ धडकल्यानंतर एका तासाने या अति तीव्र चक्रिय वादळाचे रूपांतर तीव्र वादळात झाले होते.

आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधित वाचा : 

राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोनामुळे नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता

कालच्या देशव्यापी संपात तब्बल २५ कोटी कर्मचारी सहभागी झाले होते

 

 

 

संबंधित बातम्या