यंदा देशात साखरेचे तीनशे लाख टन उत्पादन!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

२०२०-२१ च्या गळीत हंगामात ३०५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इस्मा या देशभरातील साखर कारखानदारांच्या संघटनेने व्यक्त केला. यात इथेनॉल उत्पादनासाठी १५ लाख टन उसाचा उपयोग वगळला आहे. तसेच महाराष्ट्रात वाढीव ४६.३४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.

नवी दिल्ली :  २०२०-२१ च्या गळीत हंगामात ३०५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इस्मा या देशभरातील साखर कारखानदारांच्या संघटनेने व्यक्त केला. यात इथेनॉल उत्पादनासाठी १५ लाख टन उसाचा उपयोग वगळला आहे. तसेच महाराष्ट्रात वाढीव ४६.३४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.

‘इस्मा’च्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन त्यात हा अंदाज व्यक्त करण्यात आला. या बैठकीला साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधीही हजर होते. साखर उतारा, मान्सूनचा परिणाम, जलसाठ्यांमधील उपलब्धता याआधारे ऊस उत्पादनाचा आढावा घेण्यात घेण्यात आला.  देशभरातील उसाचा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उपग्रहाद्वारे आढावा घेतल्यानंतर आढळून आले आहे, की यंदाच्या गळीत हंगामासाठी ५२.६८ लाख हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असून मागील हंगामाच्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक आहे

संबंधित बातम्या