Rajya Sabha तून आणखी तीन विरोधी खासदार निलंबित, आतापर्यंत 27 खासदार निलंबित

Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळात सुरु आहे.
Rajya Sabha
Rajya SabhaDainik Gomantak

Monsoon Session of Parliament: संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळात सुरु आहे. राज्यसभेत आज आणखी 3 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेतील आतापर्यंत 23 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. हे तीन खासदार सुशील कुमार गुप्ता (आप), संदीप पाठक आणि अजित कुमार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षांच्या एकूण 27 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाबाबत खासदार 50 तासांचे धरणेही धरत आहेत, त्याअंतर्गत पाच खासदारांनी संसदेच्या आवारात रात्रही काढली. आजही हे आंदोलन सुरुच आहे.

दरम्यान, खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आपल्या लोकशाही (Democracy) अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे (Congress) असेही म्हणणे आहे की, 'आमच्या सर्वोच्च नेतृत्वाचा "छळ" केला जात आहे. तपास यंत्रणांविरुद्ध निदर्शने करण्याची परवानगी देखील दिली जात नाहीये. निदर्शने करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे.' काँग्रेसच्या या आरोपांना उत्तर देताना केंद्राने म्हटले की, भारतातील सर्वात जुना पक्ष कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणत आहे.

Rajya Sabha
Rajya Sabha: विरोधी पक्षांचे आणखी दहा खासदार राज्यसभेतून निलंबित

दुसरीकडे, काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी गुरुवारी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'सरकारला संसदेत महागाई आणि बेरोजगारीवर चर्चा नको आहे. बाहेरुन तपास यंत्रणा राजकीय सूडबुद्धीने सोनिया गांधींना त्रास देत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळातही आंदोलने झाली पण आम्ही कुणालाही निलंबित केले नाही.'

पायलट पुढे म्हणाले की, 'काँग्रेसचे कार्यालय पोलीस चौकी बनले आहे. तिथे कार्यकर्ते आंदोलन करु शकत नाहीत.'

Rajya Sabha
Rajya Sabha Nomination: पीटी उषा अन् इलैया राजा यांची राज्यसभेवर निवड

तसेच, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांचे निलंबन बेकायदेशीर असल्याचे सांगत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. जनतेचा आवाज दाबून ही अलोकतांत्रिक, एकतर्फी कृती करण्याची परवानगी देता येणार नाही, असेही खरगे यांनी म्हटले.

शिवाय, या आरोपांना उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, 'कोणीही कायद्याच्या वर नाही. "महाराणी असो की क्राऊन प्रिन्स,'' काँग्रेस पक्ष स्वत:ला न्यायपालिका आणि कायद्यापेक्षा वरचा समजतो. ते तपास का टाळत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य बाहेर येईल."

Rajya Sabha
Rajya Sabha Elections: कर्नाटकात भाजपची सरशी, कॉंग्रेसने जिंकली 1 जागा

त्याचबरोबर, भाजप (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही काँग्रेसचा विरोध हा सत्याग्रह नसून सत्य लपवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते देशाला नव्हे तर कुटुंब वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com