चित्रपटाच्या कथेला लाजवणारी घटना; उत्तरप्रदेशच्या जेलमध्ये गोळीबार, ३ कैदी ठार

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

मृतांमध्ये अंशू दीक्षित, मेराजुद्दीन उर्फ मेराज अली आणि मुकली काला यांचा समावेश आहे.

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्रकूटमध्ये (Chitrakoot) रगौली जेलमध्ये झालेल्या एका घटनेने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जेलमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू (Three prisoners killed) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या चित्रकूट (Chitrakoot) जेलमध्ये ही घटना घडली असून एका कैद्याने आपल्या दोन साथीदारांचा गोळ्या घालून केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा  मृत्यू झाला आहे. तर या घटनांतर संपूर्ण प्रकर्णची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.(Three prisoners killed in jail shooting in Uttarpradesh)

विनाशकाले विपरित बुध्दी; सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णावर बलात्कार
रगौली जेलचे जेलर एसपी त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार जेलमध्ये असणाऱ्या काही कैद्यांमध्ये वाद झाले आणि हे वाद विकोपाला पोहोचल्यानंतर त्यातील एका कैद्याने इतर दोघांचा खून केला आहे. तर यावेळी पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्या कैद्याचा आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. 

मृतांमध्ये अंशू दीक्षित, मेराजुद्दीन उर्फ मेराज अली आणि मुकली काला यांचा समावेश असल्याची माहिती जेल अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यातील अंशू दीक्षितने मेराज अली आणि मुकील काला यांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अंशू दीक्षितचा देखील मृत्यू झाला आहे.  
 

संबंधित बातम्या