'तिरेंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’ सिंघू बॉर्डरवरील वातावरण तापलं

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

‘तिरेंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’ अशा घोषणा देत महामार्ग त्वरित खुला करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दिल्ली : दिल्लीत पुन्हा एखदा संघर्षाची ठिणगी पडली. सिंघू बॉर्डरवर स्थानिक विरुध्द आंदोलक शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत हिंसाचार उफाळून आला होता. स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यात उडालेला संघर्षाचा भडका कमी करण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला आहे. आणि संघर्षाची परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र तणाव अद्याप तरी कायम आहे.

राष्ट्रपतींचे संसदिय अभिभाषण : "कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच"

गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशासंह देशभरातील शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. केंद्रसरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या आकरा फेऱ्या पार पडल्या, मात्र कृषी कायद्यांच्या बाबतीत तोडगा निघू शकलेला नाही. गेल्या दोन महिन्यात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. कृषी कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाने समिती गठीत केली होती. मात्र शेतकरी नेत्यांनी समितीमधील सदस्यांविषयी त्यांचे मतभेद होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शांतीपूर्ण रितीने दिल्लीच्य़ा सीमेवरुन ट्रक्टर रॅली काढत असताना अचानक हिंसक वळण लागले. आणि दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांकडून निशाण साहिब ध्वज फडकवण्यात आला.

दरम्यान आंदोलक शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात हिंसक झडप झाली. त्यात आंदोलक शेतकरी आणि पोलिस दोन्ही जखमी झाले. शुक्रवारी दिल्ली जवळच्या सिंघू सीमेवर स्थानिक नागरिकांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडले. ‘तिरेंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’ अशा घोषणा देत महामार्ग त्वरित खुला करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दोन्ही बाजूंकडून आंदोलन चालू असताना अचानक वादाची ठिणगी पडली आणि बघता बघता वादाचे रुपांतर झडपी मध्ये झाले. दोन्ही बाजूंकडून तूफान दगडफेक झाली. आंदोलनाला हिंसक वळण लागताच पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ला केला. एका आंदोलकाने पोलिस अधिकाऱ्यावर तलवारीने वार केले. लगेच हल्ला करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या