टीएमसीने स्रिनशॉट देत निवडणूक आयोगाकडे केली मतदान प्रक्रियेत लक्ष देण्याची विनंती

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

पहिल्या टप्प्य़ात मतदानाच्या अ‍ॅपमध्ये विसंगती आढळूण आल्याने तृणमुल कॉंग्रेसने निवडणुक आयोगाकडे आपली चिंता व्य़क्त केली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्या टप्प्य़ातच मतदानाच्या अ‍ॅपमध्ये विसंगती आढळूण आल्याने तृणमुल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे आपली चिंता व्य़क्त केली आहे. यासंदर्भात तृणमुल पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची आज भेट घेणार आहे.

काय होत आहे@ECISVEEP?!  मतदानाची टक्केवारी केवळ 5  मिनिटात अर्ध्यावर कशी आली आहे ते तुम्ही समजावून सांगू शकाल का? तृणमुल पक्षाने निवडणूक आयोगाच्या मतदानाच्य़ा अ‍ॅपचे स्क्रिनशॉट देखील ट्विट केले आहेत. त्यानुसार पूर्बो मोदिनीपूर जिल्ह्यातील विधानसभा जागावरील मतदान पाच मिनिटात 10  टक्क्य़ांनी कमी झाल्य़ाचे दिसून आले. (The TMC gave a screenshot and requested the Election Commission to look into the voting process)

''भाजपा गुंड,चोर आणि खोटरड्या लोकांनी भरलेला पक्ष''

तृणमुल पक्षाचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन आणि सुदीप बंडोपाध्याय यांच्यासह टीएमसीचे दहा संसदीय़ प्रतिनिधीमंडळ दुपारच्या सुमारास कोलकातामधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. इव्हीएममधील कथित विसंगतीबद्दल निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्य़ा टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून 30 मतदारसंघातील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2 मे ला अंतीम मतमोजणी होणार आहे. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत. तर भाजपला 200  पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा विश्वास आहे.

 

संबंधित बातम्या