'खेला होबे' म्हणत भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंसक घटनांमध्येही वाढ होताना दिसते आहे. त्यातच आता हावडा दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणतीदेव सेनगुप्ता यांच्या ताफ्यावर गुरुवारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंसक घटनांमध्येही वाढ होताना दिसते आहे.  त्यातच आता हावडा दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणतीदेव सेनगुप्ता यांच्या ताफ्यावर गुरुवारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात भाजप नेत्याच्या गाडीसमोरील भागाचे नुकसान झाले, तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यावर देखील हल्ला झाल्याचे समजते आहे. (TMC Party Workers attacked on BJP Leaders In west Bengal)

 "माझ्या वाहनावर हल्ला करणारे लोक 'खेला होबे'च्या घोषणा देत" काही कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप  भाजपचे उमेदवार  रणतीदेव सेनगुप्ता यांनी केला आहे. तसेच विरोधक पराभव स्वीकारू शकत नसल्याने अशा गोष्टी करत असल्याचे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर काल दक्षिण कोलकाता येथे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यावर देखील हल्ला केला असल्याची माहिती मिळते आहे. कूचबिहार जिल्ह्यातील आणखी एका घटनेत टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी माथाभंगा मतदार संघातील आपल्या पक्षाच्या उमेदवारावर हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये  विधानसभेच्या २९४ जागांसाठी मतदान सुरु असून, शनिवारी चौथा टप्पा पार पडणार आहे. तृणमूलच्या नंदिता चौधरी आणि माकपच्या सुमित्रा अधिकारी यांच्याविरोधात भाजपने रणतीदेव सेनगुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. ८ टप्प्यांत होणऱ्या या निवडणुकांचे २ मी रोजी निकाल लागणार आहे. 

संबंधित बातम्या