भारतीय सैन्य दल ७ डिसेंबर रोजी ध्वज दिन का साजरा करते?वाचा...

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 7 डिसेंबर 2020

आज ७ डिसेंबर. देशात सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून आजच्या दिवसाचे महत्व अधोरेखित केले जाते. आजच्या दिवशी सैन्याला मिळणाऱ्या निधीतून युद्धाच्या प्रसंगी गंभीर जखमी झालेल्या सैनिकांच्या परिवाराला तसेच युद्धभूमीवर हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या परिवाराला मदत केली जाते. 

 नवी दिल्ली-  आज ७ डिसेंबर. देशात सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून आजच्या दिवसाचे महत्व अधोरेखित केले जाते. आजच्या दिवशी सैन्याला मिळणाऱ्या निधीतून युद्धाच्या प्रसंगी गंभीर जखमी झालेल्या सैनिकांच्या परिवाराला तसेच युद्धभूमीवर हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या परिवाराला मदत केली जाते. 

 का साजरा केला जातो ध्वज दिन ? 

ऑगस्ट १९४९मध्ये सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ७ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ दोन वर्षात सैन्या दलाच्या विकासासाठी हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही १९५४ मध्ये नागरिकांना देशाच्या सैन्यासाठी निधी उभारून सैन्यात भरती होणाऱ्या नवीन जवानांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले होते. 

 कसा आहे आपल्या सैन्याचा ध्वज?

भारतीय सैन्याचा ध्वज आणि ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचा ध्वज यांमध्ये काही प्रमाणात साम्य आहे. ब्रिटीशांनी राजवट केलेल्या देशांच्या ध्वजांमध्ये थोड्याफार प्रमाणात साम्य सर्वत्र आढळून येते. जसे भारताच्या ध्वजाचा रंग हा नायजेरियाच्या ध्वजाशी मिळताजुळता आहे. 
  
का आहे ध्वज दिन महत्वाचा ? 

भारताच्या सशस्त्र सेना ध्वज दिनाची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. देशाच्या सैन्यात नोकरी करणाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तसेच युद्धात गंभीर जखमी झालेल्या किंवा कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी आणि माजी सैनिकांना पुनर्रस्थायिक होण्यासाठी आजचा दिन महत्वाचा असून आज जमा झालेला निधी त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी खर्च केला जातो. 

आजच्या दिवसाचे औचित्य साधून भूदल, नौदल आणि वायूदलाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. 

संबंधित बातम्या