Today News: लसीकरणासाठी नोंदणी सुरु ते अमेरिकेकडून मदतीचा हात; वाचा महत्त्वाच्या बातम्या

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

शेअर बाजाराला देण्यात आलेल्या माहितीत इन्फ एजने सांगितले की झोमॅटो आयपीओ सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. त्यात झोमाटो लि. विक्रीच्या ऑफरमध्ये इन्फो एजचा समावेश असणार आहे. झोमाटोसाठी निधी उभारल्यानंतर त्यातील इन्फो एजची हिस्सेदारी 18.4 टक्के झाली आहे. 

नवी दिल्ली: इन्फो एज यांनी मंगळवारी सांगितले की ते झोमाटो या ऑनलाइन फूड ऑर्डर करणार्‍या कंपनीच्या आयपीओ अंतर्गत 750 कोटी रुपयांचा हिस्सा विकणार आहे. शेअर बाजाराला देण्यात आलेल्या माहितीत इन्फ एजने सांगितले की झोमॅटो आयपीओ सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. त्यात झोमाटो लि. विक्रीच्या ऑफरमध्ये इन्फो एजचा समावेश असणार आहे. झोमाटोसाठी निधी उभारल्यानंतर त्यातील इन्फो एजची हिस्सेदारी 18.4 टक्के झाली आहे. 

दिल्लीत नवा कायदा लागू; ‘’सरकार’’ म्हणजे नायब राज्यपाल 

लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

भारतात 18+ वयोगटातील सर्व लोकांच्या कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे आता नोंदणी प्रक्रियादेखील पूर्ण केरता येणार आहे. कोविन अ‍ॅप व आरोग्य सेतुच्या माध्यमातून कुटूंबाच्या चार सदस्यांना कोरोना लसीकरणाचा फायदा होणार आहे.

Covishield Vaccine: अदर पुनावालांची मोठी घोषणा; लसीची किमंत 100 रुपयांनी केली कमी

 ब्रेट लीने केला भारताला एक बिटक्वाइन दान

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सपासून प्रेरीत होवून  ब्रेट लीने देखील भारताला एक बिटक्वाइन (40 लाख रुपये) दान करण्याची घोषणा केली आहे. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या कमिन्सने सोमवारी कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 'पीएम केअर फंड' मध्ये 50,000 डॉलर म्हणजेच सुमारे 37 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

ऑक्सिजन सिलेंडर्सच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश 

अमेरिकेची भारताला सर्वतोपरी मदत

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन कोरोनाबरोबरच्या लढाईत कठीण काळात भारताच्या बाजूने उभे राहण्याविषयी बोलले होते. यापूर्वी सोमवारी बायडन यांनी संकटाच्या काळात अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करेल,असे ट्विट करून म्हटले आहे. 

संबंधित बातम्या