बिहारची परीक्षा उद्या संपणार..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

 बिहार विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे.

पाटणा :  बिहार विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी (ता.७) होणार आहे. तिसऱ्या  टप्प्यात पश्‍चिम चंपारण, सीतामढी, दरभंगा, मधुबनी, सुपौल, मधेपुरा, सहरसा, पूर्णिया, अरेरिया, किशनगंज आणि कटिहार या मतदारसंघात ७८ जागांवर उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराची सांगता होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. निवडणूक प्रचार हा फक्त विकासाभोवतीच केंद्रित राहिला हे अभिमानास्पद आहे, असेही ते म्‍हणाले.

संबंधित बातम्या