'Facebook-whatsapp' वर बंदी घालण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मोदी सरकारकडे केली आहे

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

whatsapp ची मालकी असणाऱ्या फेसबुकवर त्वरीत बंदी घालण्याचा आदेश केंद्रसरकारने काढावा यासाठी CAIT ने केंद्रीय प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्र लिहून मागणी केली आहे.

 

मुंबई : Whatsapp ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यापासून रोखण्यात यांव यासाठी अॉ इंडिया ट्रेडर्सने(CAIT) पत्राद्वारे बंदी घालण्याची मागणी केली आहे.whatsapp ची मालकी असणाऱ्या फेसबुकवर त्वरीत बंदी घालण्याचा आदेश केंद्रसरकारने काढावा यासाठी CAIT ने केंद्रीय प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्र लिहून मागणी केली आहे.

या नव्या पॉलिसीनंतर युजरचा सर्व व्यक्तीगत डेटा,पेमेंट्स ट्रांजेक्शन,लोकेशन्स यासंबंधीची माहीती व्हाट्सअपच्या हाती लागणार आहे.त्यामुळे कंपनी भविष्यात या माहितीचा स्व:ताच्या फायद्यासाठी वापर करु शकेल अशी भिती व्यक्त केली जात आहे.व्यक्तिचा पर्सनल डेटा खूप आवश्यक आहे,त्याचा गैरवापर झाल्यास अर्थव्यवस्थेला धोका असणारच आहे. त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेला ही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भारतात whatsapp चे 20 कोटींपेक्षा अधिक युजर्स असल्याकारणाने संभवतःहा धोका मोठा आहे.

त्यामुळे त्यांच्या पॉलिसीला भारतात लागू होण्यापूर्वीच रोखण्यात यांव यासाठी व्यापाऱ्यांनी मोदी सरकारकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच whatsapp ने आणलेल्या डेटा प्रायव्हसी पॉलिसीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.या नव्या पॉलिसीच्या विरोधात सोशल मिडीयावरुन बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.यातच व्यापाऱ्यांनी फेसबुकवर बंदी घालण्यात अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या