देशभरात 642 “श्रमिक विशेष” गाड्यांची वाहतूक

GOA_TRAIN_TO_MP_MAY_
GOA_TRAIN_TO_MP_MAY_

नवी दिल्‍ली

देशाच्या विविध भागात लॉक डाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना आपल्या मूळ गावी पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार भारतीय रेल्वे विभागाने “श्रमिक विशेष” गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सुरु झालेल्या गाड्यांच्या वाहतुकीद्वारे 13 मे 2020 पर्यंत देशाच्या विविध राज्यातून 642 “श्रमिक विशेष” गाड्यांची सेवा कार्यान्वित झाली. या विशेष गाड्यांमधून प्रवास करून आतापर्यंत सुमारे 7 लाख 90,000 प्रवासी आपापल्या राज्यांमध्ये पोहोचले आहेत. जे राज्य प्रवाशांना पाठविणार आणि ज्या राज्यांमध्ये प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्य सरकारांचे प्रवासी पाठवण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊन त्यांनी प्रवासाला संमती दिल्यानंतरच या विशेष गाड्यांची वाहतूक सुरु केली जात आहे.

आंध्रप्रदेश (3 गाड्या), बिहार (169 गाड्या), छत्तीसगड (6 गाड्या), हिमाचल प्रदेश (1 गाडी), जम्मू-काश्मीर (3 गाड्या), झारखंड (40 गाड्या), कर्नाटक (1 गाडी), मध्य प्रदेश (53 गाड्या), महाराष्ट्र (3 गाड्या), मणिपूर (1 गाडी), मिझोरम (1 गाडी), ओदिशा (38 गाड्या), राजस्थान (8 गाड्या), तामिळनाडू (1 गाडी), तेलंगणा (1 गाडी), त्रिपुरा (1 गाडी), उत्तरप्रदेश (301 गाड्या), उत्तराखंड (4 गाड्या) आणि पश्चिम बंगाल (7 गाड्या) अशा विविध राज्यांमध्ये पोहोचून या 642 “श्रमिक विशेष” गाड्यांचा प्रवास संपुष्टात आला.

श्रमिक विशेष गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व प्रवाश्यांची व्यवस्थित तपासणी झाली आहे याची खात्री केल्यानंतरच त्यांना या गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. प्रवासादरम्यान या  प्रवाश्यांना रेल्वे विभागाकडून मोफत भोजन आणि पाणी पुरविले जात आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com